पान:तरंग अंतरंग.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मला उभं केलं आणि चालायला लागला त्याच्या तरातरा चालण्यावरून दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे पत्ता त्याला पक्का माहीत असावा आणि दुसरं म्हणजे ठिकाण जवळपासच असावं. खरोखरच पत्ता जवळचा होता. पाचच मिनिटात आम्ही एका घराजवळ पोचलो. मोहननं त्याच्या जन्मभराच्या ऑफिसरी थाटात त्या घराची बेल दाबली. मध्यम वयीन सुस्वरूप खानदानी चेहऱ्याच्या चाळीशी पार केलेल्या स्त्रीने दरवाजा उघडला. 'भाईसाब आप ?' म्हणत आदराने तिने आम्हा दोघांना आत बोलावलं. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि आनंद न मावणारा होता. 'वहिनी, बच्चे कंपनी कशी आहेत?' असे काही जवळकीने प्रश्न मोहनला तिने चक्क मराठीतच विचारत नवऱ्याला हाक मारली. मला हा बोलीभाषेतला फरक चकित करून गेला. ऐकलं का ? आज सूर्य पश्चिमेला उगवला आहे. 'या लवकर !' म्हणत लगबगीनं ती आत गेली. संपूर्ण पोलिसी गणवेशात येऊन तिच्या नवऱ्याने मोहनला एक कडक सलाम ठोकला आणि उभाच राहिला. मोहननेच त्याला बसायला सांगितले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तोपर्यंत नाश्ता, चहाचा ट्रे हातात घेऊन हसत हसतच मघाचीच स्त्री आणि पाठोपाठ कडक वेशातील नोकर आला. चहा-पाणी घेता घेता मोहन बहुतेक विषयाला हात कसा घालावा या विचारात होता. तोच तो म्हणाला, 'साब, मुझे बुलाया होता तो मैं खुद ही आपके घर आता ! ' मोहनने त्याला विचारलं, 'मुलं कुठं असतात ? तपन कुठं असतो ? काय करतो ? रिया कुठे असते, तिचं मेडिकल झालं का पूरं ?' 'नाही. तिचं शेवटचं वर्ष आहे आणि तपन इंजिनियर झाला! गोल्ड मेडलिस्ट आहे. टाटांच्या - कॅम्पसमध्येच TCS मध्ये छान ऑफर मिल गई,' असे शुद्ध मराठी आणि हिंदी मिसळूनच तो बोलत होता. 'वा, वा, अभिनंदन! कुठं आहे?' 'तपन, रिया, अरे कोण आलंय बघा!' असे म्हणत त्याने मुलांना हाक मारली. मुलांच्याबरोबर त्यांची आईही आली. दोन्ही मुलांनी मोहनला आणि मलाही वाकून नमस्कार केला आणि तिघेही स्थानापन्न झाले. 'हं! काय तपन केव्हा जॉईन होणार ? कुठं आहे पोस्टिंग ?' मोहननं आपुलकीनं विचारपूस केली. 'जॉईन व्हायला वेळ आहे. सुरुवातीला मुंबईत ओरिएंटेशन प्रोग्राम आहे. मग भारतात कुठेही पोस्टिंग होईल.' तपनने आदबीने उत्तर दिले. यावर माझ्याकडं बघत मोहन म्हणाला, 'याचं तपन हे नाव माझ्या बायकोनं ठेवलंय बरं का.' मोहनची आणि या कुटुंबाची अनेक वर्षांची घसट माझ्या लगेचच लक्षात आली. 'रिया, तुझं लास्ट इयर कसं चाललंय. भावासारखं गोल्ड मिळवणार का ?' मोहननं आता मुलीकडं आपली चौकशी वळवली. ती थोडं हसऱ्या चेहऱ्याने किंचित खाली मान झुकवून म्हणाली, 'भैय्यानं मेडल तरंग अंतरंग / १२