पान:तरंग अंतरंग.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घराण्याची संपूर्ण कुंडलीच बाप्यानं आमच्यासमोर मांडली. एकवेळ दुसरी कुठलीही जात चालली असती रे पण धर्म ? रीतिरिवाज, खानपान, राहणी, संस्कार सारंच दुसऱ्या टोकाचं रे ! तुम्हाला माहीत आहे आमच्याकडे अजून श्राद्ध पक्ष, गणपती अनंतपासून अगदी नागपंचमीपर्यंत सारं साग्रसंगीत असतं आणि त्याच्या डोळ्यात करुणेचा सागरच जमा झाला. बालपणापासून आतापर्यंत त्याला एवढा हताश झालेला मी कधीच पाहिला नव्हता. आम्ही पाठीवर हात फिरवून त्याला समजावलं. निघेल काहीतरी चांगला मार्ग ! असं म्हणून आश्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. मोहन पण आश्वासन देत बाप्याला म्हणाला, "माझी खात्यातली सारी मंडळी कामाला लावतो. तू चिंता करू नको. लक्षात ठेव, तुमची मुलं पण थिल्लर विचारानं निर्णय घेणारी नाहीत. " कुणालाही जन्माचा जोडीदार म्हणून नाही निवडणार, याची खात्री बाळग. तुझा नातू डॉक्टर झाला आहे, कामावर रुजू झाला आहे. तेव्हा दार बंद न करता मोकळेपणाने त्याला बरोबर घेऊन गप्पा मार." आम्ही उद्या येतो. असे म्हणत मोहन आणि त्याच्याबरोबर मीही उठलो. कसाबसा आम्हाला निरोप देऊन बापू पुन्हा झोपाळ्यावर मान खाली घालून बसला. वर्तमानपत्रात येणाऱ्या लव जिहादच्या बातम्या आम्हा दोघांच्याही मेंदूला मुंग्या आणत होत्या. काळ झपाट्यानं बदलत होता. मुलाला व मुलीला सरळ ठार मारण्याएवढा कटुपणा फोफावला होता. नैतिकतेची मूल्ये बदलत होती. सर्वसाधारणपणे कष्टानं, आपली आणि घराण्याची संस्कृती मोठ्या काळजीनं, कष्टांनं सांभाळणाऱ्या मध्यम वर्गाची झोप उडवणारी उदाहरणं राजरोसपणे घडत होती. मन सैरभैर करत होती. मिडिया सर्रासपणे एकतर्फी विचारांचा जबरी प्रचार करून तरुणांचे आयुष्य अविचारानं दावणीला बांधायचा प्रयोग आवर्जून राबवत होता. मी आणि मोहन दोघेही सुन्न झालो होतो. बेचैनीत घरी जायचेही सुचेना. मी आणि मोहन, आता तुरळकच वर्दळ उरलेल्या नाना-नानी पार्कमधल्या कोपऱ्यातल्या एका बाकावर सावलीत बसलो. बाटलीतलं थंडगार पाणी दोघेही घटाघटा प्यालो. एकमेकांच्या त्रस्त चेहऱ्याकडे क्षणभर फक्त बघत राहिलो. मोहनला पोलिसी खात्यातील नोकरीमुळे समाजकारणातला गहिरा अनुभव. मोहन एवढ्यात म्हणाला, 'आप्प्या! उठ. चल. आता बसून उपयोगी नाही.' त्यानं डायल करून मोबाईल कानाला लावला आणि म्हणाला, बाप्या 'त्याचा' पत्ता सांग. बापूनी पत्ता सांगितला. माझं लक्ष क्षणभरही त्याच्या चेहऱ्यावरून ढळलं नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर का कोण जाणे थोडी आश्वासक तरतरी आल्याचं मला वाटलं बहुदा माझ्या मनातील wishfull thinking चाच परिणाम असावा. माझ्याशी काहीही न बोलता मोहनने आपल्या मजबूत हातांनी माझा दंड पकडून ११ / तरंग अंतरंग