Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राहिली व पर्सोनेल ऑफिसरसमोर जाऊन आपली मूळ सर्टिफिकेटस् गोळा करू लागली. आम्ही सारेच एकदम क्षणभर स्तब्ध झालो. मी पुन्हाः खुर्चीकडे निर्देश करून तिला म्हणालो, "स्मृती साने, आपण बसा. अशी प्रतिक्रिया तुमच्या आयुष्यातल्या पहिल्याच इंटरव्ह्यूसाठी बरोबर नाही. असे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगू शकतो. " कदाचित, माझ्या वयाकडे पाहून वा माझ्या प्रेमळ, काळजी व्यक्त करणाऱ्या आवाजाने प्रेरित होऊन असेल ती परत स्थानापन्न झाली. तेवढ्यात चहा आला आणि मी म्हणालो, "चहा घ्या." थोडे पाणी पिऊन तिने चहाचा कप हातात धरला आणि आम्ही सर्वांनी चहा प्यायला सुरुवात केलेली पाहून तिने पहिला घोट घेतला. चेहऱ्यावरचा किंचितसा ताण दूर झाला होता. स्मितहास्य करत ती म्हणाली, "मस्त! कडक झाला आहे. मला असाच आवडतो." मी म्हणालो, "मी तुम्हाला एकेरी नावाने काही विचारले तर चालेल ना ?" "हो, आपण माझ्या वडिलांपेक्षाही मोठे दिसता आहात. मुळीच हरकत नाही. " "मग मला सांग स्मृती, तू एकदम अशी निघून जाण्यासाठी का उभी राहिलीस ?" "सर, दोन-चार दिवसांपूर्वी सकाळी चहाच्या टेबलवर माझी माझ्या वडिलांच्या बरोबर माझ्या पुढील वाटचालीबद्दल चर्चा झाली होती. बाबांनी त्यांच्या कंपनीत किंवा त्यांच्या ओळखी असलेल्या अनेक कंपन्यांत कुठेही मला नोकरी मिळवून देऊ शकतो, याची मला जाणीव करून दिली होती. तेव्हा मी स्पष्टपणे त्यांना सांगितले होते की, माझ्या स्वतःच्या प्रयत्नांतूनच माझे इंडस्ट्रीतील स्थान मी नक्की करू इच्छिते. तेव्हा, काय वाट्टेल ते झाले तरी माझ्यासाठी ते कोठेही शब्द टाकणार नाहीत. असे आश्वासन त्यांनी मला दिले होते. असे असताना त्यांनी इथे फोन केला, असे हे सर म्हणाले. मला इतके नक्की ठाऊक होते की, माझे बाबा निश्चितच असा फोन करणार नाहीत. त्यामुळे इथूनच कुणीतरी त्यांना माझ्या अर्जाच्या माहितीनुसार फोन केला असावा, असे मला वाटले. जे मला नाही पटले आणि अशा कंपनीत मला काम करावे, असे नाही वाटले सर! I am sorry!" "वा.. वा! स्मृती, I highly appreciate your approach!" मी म्हणालो, तसे तिच्या चेहऱ्यावर एक छान आत्मविश्वासाचे स्मितहास्य पसरले, "Thank you Sir " देशपांडे साहेब तुम्हाला स्मृतीला अजून काही विचारायचे आहे का ?" असे मी विचारले. यावर देशपांडे हसतच स्मृतीला म्हणाले, "मी तुम्हाला एखाद्या विषयावर तुमच्या इन्स्टंट प्रतिक्रिया कशा आहेत, हे पाहण्यासाठी फोनची कल्पित गोष्ट सांगितली. तुम्ही व्यक्त केलेल्या खात्रीप्रमाणेच तुमच्या वडिलांचा फोन आला नव्हता. आमच्या या तरंग अंतरंग / ११६