Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनावरचे शिल्प तरुण मुला-मुलींची कर्तबगारी, हुशारी, उत्साह, परिस्थितीचा बारकाईने विचार करून बेधडक टक्कर घ्यायची धाडसी वृत्ती, हे सर्व माझ्यासारख्या निवृत्त व्यक्तीला नेहमीच अतीव आनंद आणि समाधान देऊन जाते. आयुष्यात अशाच काहीशा विचारशक्तीच्या, Sense of belonging च्या आटोकाट प्रयत्नाने आणि नशिबाच्या साथीने औद्यगिक क्षेत्रामध्ये मला अध्यक्षपदापर्यंत जाता आले. या साऱ्या जवळजवळ चाळीस वर्षांच्या दीर्घ काळात अनेक लहान-मोठ्या व्यक्ती वेगळेच आयुष्य घडवणारे अनुभव देऊन गेल्या. अगदी रोजंदारीवरच्या कामगारांपासून ते चेअरमनपर्यंत भेटलेली प्रत्येक व्यक्ती मला उपकृत करून गेली. उच्चपदी असताना बहुधा दरवर्षी नोकरीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती अशाच मनोरंजक आणि अनुभवात भर घालणाऱ्या असत. अशाच एका इंजिनिअरच्या निवडीसाठीच्या प्रसंगी एक छान, व्यवस्थित पोषाखातील, टवटवीत, उल्हास आणि उत्साही चेहऱ्याची नुकतीच इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली कन्या "मे आय कम इन सर, " विचारून आत आली. आमची टीम अगोदरच्या उमेदवाराबद्दल थोडी कुजबुजत होती ती थांबवून "यस प्लीज," म्हणून मी समोर ठेवलेल्या खुर्चीकडे निर्देश करून तिला बसायला सांगितले. आमचे पर्सोनेल ऑफिसर श्री. देशपांडे यांनी मागितल्यावर तिने आपली सारी मूळ सर्टिफिकेटस् सादर केली. अर्थातच, त्याच्या झेरॉक्स कॉपीज् आम्ही अगोदरच पाहिल्या होत्या आणि साऱ्यांनाच ती एक उत्तम खेळ, नाटक, वक्तृत्व इत्यादी सर्वच क्षेत्रांतील हरहुन्नरी हुशार विद्यार्थिनी असल्याचं समजलं होतं. आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हेडच्या प्रमुखांनी त्या विषयातली खोली जाणण्यासाठी प्रश्न विचारले. ज्या सफाईने आणि स्पष्टपणे तिने उत्तरे दिली, ती सारीच आतापर्यंतच्या उमेदवारांत वेगळी उंची गाठणारी होती. वैयक्तिक माहितीही उत्तम होती. देशपांडे सर तिला म्हणाले, "तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे तुमचे वडील नावाजलेल्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आहेत; असे असताना मग तुम्ही आमच्या या त्या मानाने लहान युनिटमध्ये का अर्ज केलात ? वडिलांना तुमची उमेदवारी त्यांच्या कंपनीसाठी तेवढी योग्य नाही वाटली का?" "मी कुठे काम करायचे, हे वडील नाही तर मीच माझ्या आवडीप्रमाणे ठरवणार आहे.....आणि माझ्या वडिलांना त्याची स्वच्छ कल्पना आहे. माझा आज इथे इंटरव्ह्यू आहे, हे त्यांना माहीतही नाही." तिने ठामपणे उत्तर दिले. यावर पर्सोनेल ऑफिसर श्री. देशपांडे म्हणाले, "मग तुमच्या वडिलांच्या कंपनीतून आपल्या निवडीसाठी शिफारसीचा फोन कसा काय आला?" क्षणभरच तिच्या चेहऱ्यावर थोडा गोंधळ दिसला; पण क्षणभरच ! ती एकदम उभी ११५ / तरंग अंतरंग