पान:तरंग अंतरंग.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कंपनीत एका नव्या पैशाचाही गैरव्यवहार केला जात नाही. 'वशिला' हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाही..... आणि सर्वच स्टाफ कुठलाही गैरव्यवहार करणार नाही, असाच निवडला जातो. ' " "आणि हो, CONGRTULATIONS! You are selected Smruti !" मीही उठून शेकहँड करून तिला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे आनंदाच्या भरात तिने वाकून नमस्कार केला, याचे मला थोडे आश्चर्यच वाटले. मीही उत्तम भविष्यासाठी तिला तोंडभर आशीर्वाद दिले. आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे स्मृतीचा अमेरिकेहून आलेला फोन. "सर, येथील नामांकित स्पेशल मशीन्स कंपनीत Executive Director म्हणून मला आजच पदोन्नती मिळाली. तुम्हाला कदाचित आठवणार नाही; पण आजच्याच तारखेला तुमच्याकडे माझा पहिला वहिला इंटरव्ह्यू झाला होता. त्यावेळी तुम्ही मला तुमच्या वैयक्तिक अनुभवाने; पण प्रेमाने माझी दुरुस्त केलेली पहिलीच चूक आज मला आठवली आणि पहिला फोन मी तुम्हाला केला. " माझा गळा दाटून आला. माझ्याकडे बोलायला शब्दच नव्हते. इंटरव्ह्यूच्या वेळी माझ्या मनावर कोरलेले तिचे शिल्प इतक्या वर्षांनंतरही जास्तच ठळक झाले होते आणि ते उगीचच, मलाच 'मोठे' करून गेले! ११७ / तरंग अंतरंग