पान:डी व्हँलरा.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला ९१ तयारी जय्यत ठेवण्याचे कार्य चालू ठेविले होते. तहाच्या वाटाघाटीची निकाल काय होतो हे पहावे असे म्हणून तो हात जोडून स्वस्थ बसला नव्हता. उलट तो निकाल आपल्याविरुद्ध झाल्यास काय काय करावे याविषयींच्या योजना त्याच्या मनांत घोळत होत्या. क्लेअर, गॅलवे वगैरे ठिकाणच्या स्वयंसेवकांच्या पथकांची पाहणी त्याने चालू ठेवली होती. | या वेळींच एक महत्त्वाचा प्रसंग घडून आला. त्या प्रसंगी डी व्हॅलेराचा जो सन्मान करण्यांत आला तो आजपर्यंत मिळालेल्या सर्व बहुमानांपेक्षा श्रेष्ठ होय असे त्याच्याच बुद्धिप्रधान मनाला वाटले, म्हणून त्या प्रसंगाचे महत्त्व विशेष आहे. तो प्रसंग म्हणजे आयर्लंडच्या राष्ट्रीय विद्यापीठाने त्याला कुलगुरुत्व'-Chancellorshipअर्पण केल्याचा समारंभ होय. या समारंभाच्या वेळीं डी व्हॅलेरास अनेक मानपत्रे देण्यांत आली. त्या सर्वांना उत्तरादाखल भाषण करतांना डी व्हॅलेराने असे बोलून दाखविले, कीं एकंदर राष्ट्रीय जीवनाचा प्रवाह ज्या विद्यापीठांतून वाहतो, राष्ट्राच्या आत्म्याच्या तेजानें जें सदैव चकाकतें, व एकीकडे राष्ट्राच्या आकांक्षा व भावना प्रतिबिंबित करून दुसरीकडे त्या भावना व आकांक्षा अधिकाधिक जोमदार होण्यास ज्याची मदत होते तेच विद्यापीठ ‘राष्ट्रीय विद्यापीठ' यः पदवीला पात्र आहे. विद्यापीठाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी आयरिश भाषेचा उद्धार व पुरस्कार करणे हे एकच साधन होय असे आपले मत त्याने यापूर्वी अनेक वेळां प्रदर्शित केले होते, व त्याच मताचे त्याने या भाषणांत विवरण केले. तो नेहमी म्हणे,

  • स्वभाषा किंवा स्वातंत्र्य या दोहोंपैकी एकच गोष्ट तुला. मिळेल, कोणती पाहिजे बोल, असे जर कोणी मला म्हटले तर स्वभाषाहीन स्वातंत्र्य पतकरण्यापेक्षा स्वातंत्र्यविरहित स्वभाषाच | मी आनंदाने पतकरीन.