पान:डी व्हँलरा.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० डी व्हॅलेरा शब्दप्रयोगाविरुद्ध खलित्यामागोमाग खलिते धाडून लॉइड जॉर्ज यांस कसे जेरीस आणले ते वाचकांस सांगितलेच आहे. पुन्हा या वेळी राजांच्या संदेशांतील आयलंडला कमीपणा आणणारे व आयरिश लोकांविषयीं गैरसमज उत्पन्न करणारे धूर्ततेचे शब्द ताबडतोब टिपून काढून त्यांचा सणसणीत निषेध करून डी व्हॅलेराने आपली मुत्सद्देगिरी दुस-यांदा जगाच्या निदर्शनास आणून दिली. डी व्हॅलेरा आपल्या देशकार्याविषयी अत्यंत दक्ष असे. त्या कार्याची हानि करण्यासारखी एखादी गोष्ट कोठे घडते की काय याविषयीं तो पराकाष्ठेची सावधानता ठेवीत असे, आणि गरुडाच्या दृष्टीप्रमाणे तीक्ष्ण दृष्टि ठेवून आपल्या विरुद्ध कोठे कांहीं फडफडले, की त्यावर तो ताबडतोब झडप घातल्याशिवाय रहात नसे. आपले मुत्सद्देगिरीचे डाव डी व्हॅलेरावर लागू होत नाहीत म्हणून चडफडण्याचा व शिव्याशाप देण्याचा प्रसंग इंग्रजांवर यापूर्वी अनेक वेळा आला होता. तसलाच या वेळचाही प्रसंग होता. डी व्हॅलेराने पोपला तार धाडावी हा अत्यंत उर्मटपणाचा व खुनशीपणाचा प्रकार होय असा आयलंडचे माजी चीफ सेक्रेटरी यांनीं ओरडा केला, आणि लॉइड जॉर्ज यांनी तर जाहीरपणे असेही म्हटले, की या तारेमुळे तहाची वाटाघाट चालू राहील किंवा नाहीं याची देखील शंका आहे. पण इंग्रज प्रधानांनी व त्यांच्या साथीदारांनी केवढाही गिल्ला केला तरी डी व्हॅलेराची शांतता मुळीच ढळली नाहीं एक तर तो हे पूर्ण पणे जाणून होता, कीं इंग्रजांच्या मनांत खरोखरीच धडपणे तह करावयाचा असेल तर त्यांनीं वरवर कितीही आरडाओरड केली तरी तहाचा बेत बिनसणे शक्य नाही. शिवाय तो हेही ओळखून होता, कीं या तहाच्या वाटाघाटींत आयर्लंडला जे पाहिजे आहे त्याची निष्पत्ति होणे असंभवनीयच आहे. म्हणून ब्रिटिश वर्तमानपत्रांच्या व बड्या धुंडांच्या हलकल्लोळाकडे लक्ष न देता त्याने आपल्या देशाची