पान:डी व्हँलरा.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ डी व्हॅलेरा या मताचे विवरण करतांना तो अशी विचारसरणी पुढे मांडीत असे, की:-

  • स्वभाषेचा बचाव करणे हे या पिढीचे मुख्य कर्तव्य आहे. आपले राष्ट्रीय स्वातंत्र्य आज नाहीं उद्यां परत मिळेल. त्याविषयी फारशी शंका नाहीं. ते कार्य आपल्या हातून तडीस गेलें नाहीं तरी पुढची पिढी ते पार पाडील, पण स्वभाषेची गोष्ट अशी नाहीं. तिचे संरक्षण आपणच, आजच्या या पिढीनेच केले पाहिजे, नाहीं तर स्वभाषा अजीबात कायमची नष्ट होऊन जाईल. पुढची पिढी स्वतंत्र असावी म्हणून वाटेल तो स्वार्थत्याग करावयास जे आपण आज तयार आहोत ते त्या स्वातंत्र्यवृक्षाच्या फलासमान असलेली स्वभाषा त्यांना मिळाली नाहीं तरी चालेल असे म्हणून स्वस्थ बसणार काय ? जे स्वभाषेचे धन एकदां नाहीसे झाले की पुढच्या पिढीला परत मिळविता येणे शक्य नाही, याची चोरी होऊ देण्याइतके आपण अभिमानशून्य व विचारहीन आहोत की काय ?

आयर्लंडमध्ये ही व्हॅलेराचा असा बहुमान होत असतांना, व स्वयंसेवकांची जय्यत तयारी ठेवण्यांत तो गुंतला असतांना तिकडे लंडनची परिषद चालूच होती. डिसेंबरच्या प्रारंभीं ती परिषद मोडण्याच्या बेतांत येऊन लोक अस्वस्थ मनाने तिच्याविषयी अनेक तर्क करूं लागले. तहाच्या ज्या अटींचा मसुदा ब्रिटिश सरकारने सादर केला त्या डेल आयरेनच्या मंत्रिमंडळाला पसंत पडेनात. म्हणून तहाचा शक्य तितका प्रयत्न करून पहावा या हेतूने आयर्लंड ज्यास्तीत ज्यास्त आपले म्हणणे सोडण्यास किती तयार आहे त्याचे दिग्दर्शन करणारा एक उलट मसुदा तयार करून ब्रिटिश सरकारकडे पाठविण्यांत आला. त्या मसुद्यास इंग्रज सरकार मान्यता देईना, तहाची सभा मोडली अशी बातमी आली, आणि ती बातमी येतांच सोमवार तारीख