पान:डी व्हँलरा.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ तह झाला पण सिंह गेला संदेशांतील 'आयर्लंड देशांतील अडचणी' या संदिग्ध प्रयोगाने आयर्लंडच्या अडचणी फक्त ‘अंतःस्थ' आहेत असा अजाण माणसाचा गैरसमज होण्याचा संभव आहे. तसा गैरसमज आपण करून घेणार नाहीं अशी आमची खात्री आहे. आयर्लंडच्या अडचणी फक्त ‘अंतःस्थ आहेत हेही खरे नाहीं, व ब्रिटिश लोकांच्या राजाशी निष्ठेने वागण्याचे कर्तव्यही आयरिश लोकांना कबूल नाहीं. लोकांनी योग्य रीतीने निवडलेल्या प्रतिनिधींनीं आयर्लंडचे संपूर्ण स्वातंत्र्य विधिपूर्वक पूर्वीच जाहीर केलेले आहे, व ज्या ज्या वेळीं लोकमतप्रदर्शनाची संधि आली त्या त्या वेळी त्या स्वातंत्र्यास जनतेने मान्यता दर्शविलेली आहे. खरी अडचण अंतस्थ नसून ब्रिटिश संबंधाबद्दलची आहे. ब्रिटिशांनी आपली इच्छा आयर्लंडवर लादण्याचा हट्ट चालविल्यामुळे आणि आयरिश लोकांचे स्वातंत्र्य व जन्मसिद्ध हक हिरावून घेतल्यामुळेच सा-या अडचणी व भांडणें उपस्थित झाली आहेत जगांतील इतर लोकांप्रमाणेच ब्रिटिशांशीही स्नेहसंबंध राखून शांततेने राहण्याची आमची इच्छा आहे. परंतु इतकी वर्षे परमावधीचे हाल सोसूनही आम्हीं झगडा चालू ठेवला आहे यावरूनच आमची स्वातंत्र्याविषयींची तळमळ किती तीव्र आहे ते दिसून येईल. ते स्वातंत्र्य हातचे जाऊं द्यावयास आम्ही कोणत्याही मोहाने तयार होणार नाहीं. इमॉन डी व्हॅलेरा. डी व्हॅलेराने पोपला केलेली ही तार पाहतांच इंग्रजी वर्तमानपत्रांनी मोठे काहूर माजविलें. येवढ्यावरूनच ती तार करणे किती अवश्य होते हैं दिसून येण्यासारखे आहे. डी व्हॅलेराचा जागृत मुत्सद्दीपणा पाहून त्याचे शत्रूही दांतओंठ खात. लॉइड जॉर्ज यांनी डी व्हॅलेरास तहाचे निमंत्रण पाठवितांना तुम्ही लोकप्रिय पुढारी' या नात्याने या, असा कावेबाजपणाचा सूचक शब्दप्रयोग आपल्या खलित्यांत घुसडून दिलेला पाहतांच डी व्हॅलेराने ती फसवेगिरी ओळखून त्या