पान:डी व्हँलरा.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܘܐ डी व्हॅलेरा जूट आहे असे लोकांना वाटेल. म्हणून हा विनंति-अर्ज मी करीत आहे. डब्लिन, १० अक्टोबर १९२१ । इमॉन डी व्हॅलेरा ! शेवटीं नेमलेल्या दिवशी ही महत्त्वाची वाटाघाटीची सभा सुरू झाली. तिचे काम झटपट उरकण्याची साच्या प्रतिनिधींची खटपट होती. सभा मोडते की काय अशी परिस्थिति अनेक वेळां उत्पन्न झाली. सभेला पहिला अपशकुन झाला तो पांचवे जॉर्ज राजे व रोमचे पंधरावे पोप यांनी परस्परांस पाठविलेल्या संदेशांमुळेपोपचा पंचम जॉर्जना संदेश आला तो असाः| ** इंग्लंड व आयर्लंड यांजमध्ये तह होण्यासाठी खलबते पुन्हां चालू झाली हे पाहून आम्हांस अतिशय आनंद होत आहे. आज शतकानुशतकें चालत आलेलें हें वैर शमवून शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय ईश्वर आपणांस देवो अशी प्रार्थना आहे. जॉर्ज राजाकडून पोपला संदेश गेला तो असाः

  • आपल्याकडून आलेल्या संदेशाने आम्हांस फार समाधान झाले. आपल्याप्रमाणेच माझीही प्रभूजवळ अशीच प्रार्थना आहे, की सध्या लंडनमध्ये चालू असलेल्या परिषदेच्या निकालाने आयर्लंड देशांतील अडचणींचा शेवट होऊन शांततेच्या व सुखाच्या नव्या युगाचा उदय होवो. । राजांच्या या संदेशांत आयर्लंडविषयीं एक विशिष्ट कल्पना सूचित असल्यामुळे तिचे निराकरण करण्याकरितां पोपला तारेने आपले म्हणणे कळविणे डी व्हॅलेरास जरूरीचे वाटले. म्हणून त्याने पोपला ताबडतोब खालील मजकुराची तार पाठविलीः

• आपण ग्रेट ब्रिटनच्या राजांना संदेश पाठविलांत व त्यांत आयलँडच्या कल्याणाविषयींची कळकळ प्रदर्शित केलीत हे पाहून आयरिश लोकांना फार फार समाधान वाटत आहे. पण राजांच्या