पान:डी व्हँलरा.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला ८७ “आजपर्यंत इंग्लंडने आपला हक्क तरवारीच्या जोरावर गाजविला. तो हक सोडून द्यावयास आज इंग्लंड तयार होईल हे फारसे संभवनीय नाहीं. तो हक्क व तह यांचा मूलभूत विरोध आहे. आपण कितीही शहाणपण व चातुर्य दाखविले तरी ते अपुरेंच पडेल ही गोष्ट आपले प्रतिनिधि जाणून आहेत. ख-या शांततेचा लाभ आपल्याला व्हावयाचा असेल तर तो आपल्या प्रतिनिधींच्या मुत्सद्देगिरीने होण्यासारखा नसून, जन्मसिद्ध हक्क गमाविण्यापेक्षां मरण पतकरण्याची साच्या राष्ट्राची एकजात तयारी असेल तर त्या तयारीनेच होईल. हालअपेष्टा सोसूनच आयर्लंडने आजच्या परिस्थितीपर्यंत मजल मारली आहे. यापुढेही कराव्या लागणाच्या स्वार्थत्यागाकडे व भोगाव्या लागणाच्या संकटांकडे पाहून या वेळीं आयर्लंड कचरेल तर आजपर्यंतची लढाईही वायां जाईल. शत्रूच्या धमकावणीला भिऊन आपण आपला एक मुद्दा सोडला, की लगेच दुसरा, लगेच तिसरा अशा प्रकारे सर्वस्वी हार खाण्याचा आपल्यावर प्रसंग येईल. निर्भय मनाने व अढळ निश्चयाने सत्याच्या कणखर भूमीवर उभे राहून आयर्लंडने आपले म्हणणे अगदी कायम ठेवले पाहिजे. नाहीं तर शत्रू आपल्याला चकवील आणि आपला सर्वतोपरी पराजय होईल. ह इ

    • म्हणून ही वाटाघाट चालू असतांना आपल्या देशाचा नैतिक दर्जा यत्किंचितही कमी झाला तरी ते घातक ठरेल, व त्या दर्जाला कमीपणा आणण्यासारखी कृति किंवा विचार जो करील तो आयलंडचाच नव्हे तर सान्या मानवजातीचा शत्रू ठरेल. आपल्यांत फूट पडावी, आपला उत्साहभंग व्हावा आणि आपलें सामर्थ्य कमी व्हावे यासाठी आपले शत्रू हजार युक्त्या करतील. आपण सर्वांनीं सावध राहिले पाहिजे. आपल्या प्रतिनिधींवरील आपल्या मनातील विश्वास आपण. व्यक्त केला, आणि देशाची शिस्त कायम राखिली तरच आपली एक