पान:डी व्हँलरा.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें तह झाला पण सिंह गेला आयर्लंडचे प्रतिनिधि वाटघाटीसाठी लंडनला गेले असतांना आयरिश जनतेच्या मनांत कोणते विचार गर्दी करीत असतील ते डी व्हॅलेरा पूर्णपणे जाणून होता. म्हणूनच लंडनची सभा सुरू होण्याच्या सुमारास त्याने खालील जाहिरनामा आयर्लंडमध्ये प्रसिद्ध केला. * बांधवहो, - ज्या सभेसाठी आपले प्रतिनिधि लंडनला गेले आहेत ती फार महत्त्वाची आहे. आपल्या देशाचा भविष्यकाळ कोणत्या प्रकारचा होईल ते त्या सभेवर अवलंबून आहे. आपल्या देशांतील प्रत्येक व्यक्तीच्या हिताहिताशीं त्या सभेचा जिव्हाळ्याचा संबंध पोंचतो. पूर्वी आपल्यामध्ये कितीही मतभेद असले तरी आज एकजुटीने उभे राहणे यांतच साच्या राष्ट्राचे परम हित आहे. आपण पाठविलेले प्रतिनिधि आपली मोठी जबाबदारी पूर्णपणे ओळखून आहेत, साच्या देशाचा त्यांना पाठिंबा आहे व त्यांच्यावर साच्या जनतेचा विश्वास आहे असे आपल्या वर्तनाने आपण त्यांना वाटावयास लाविले पाहिजे. ब्रिटिश राज्यकर्ते व आयर्लंड यांचा तंटा समाधानकारक रीतीने मिटावा अशी आपल्या सर्वांप्रमाणे त्यांच्या अंतःकरणांतही उत्कट इच्छा आहे, पण तसा तो मिटविणे आपल्या हातांत सर्वस्वीं नाहीं हेही ते समजून आहेत. आपण ज्या हक्कांसाठी आजपर्यंत झगडलों तो असा आहे, कीं त्याविषयीं तडजोड किंवा त्वयाधं मयार्ध करणेच शक्य नाहीं. आजपर्यंत आपण ज्या यातना सोसल्या त्यांचे चीज करण्यासारखे स्वातंत्र्य आपल्याला देणारा तह झाला तरच तो चिरकाल टिकेल, व असल्या तहानेच काय तो आजपर्यंतच्या लढ्याचा शेवट होऊ शकेल. असला तह घडून येणे सोपे नाहीं.