पान:डी व्हँलरा.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह जवळ आला ८५ च आयर्लंडचा संबंध या दोहोंचा मेळ कसा घालावयाचा त्याची चर्चा करण्यात येईल. डी. लॉईड जॉर्ज. हे आमंत्रण डी व्हॅलेराने स्वीकारले, व ठरलेल्या दिवशी वाटाघाटीसाठी आमचे प्रतिनिधि लंडनला येतील असे त्याने लॉईड जॉर्ज यांस कळविलें. वाटाघाट व्हावयाचे निश्चित ठरले, व आतां आपले | पुढारी लंडनला जाणार हे वर्तमान समजतांच आयरिश लोकांच्या मनांत आशानिराशांचे काहूर माजलें. कदाचित् ही वाटाघाट फलदायी होऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य व शांतता यांचा लाभ होईल | अशा आशेने त्यांची अंतःकरणे क्षणभर आनंदित होत, तर लगेच दुस-याच क्षणी त्यांचे मन त्यांना सांगे, न जाणों, इंग्लंडसारख्या धूर्त राष्ट्राशीं गांठ आहे तेव्हां कदाचित् आपले प्रतिनिधि एखाद्या मायावी मोहाला बळी पडतील व नकली स्वातंत्र्य पदरांत घेऊन येतील, किंवा कदाचित् वाटाघाटींत दोन्ही पक्षांच्या म्हणण्यांतील विरोध कायम राहून पुन्हां देशांत जिकडे तिकडे दंगाधोपा माजून राहील ! काय होते काय नाहीं अशा अधीर मनोवृत्तीने लोकांचे लक्ष वाटाघाटीच्या बातमीकडे लागलें ! इतके दिवस डी व्हॅलेराने जी निकराची बाणेदार लढाई केली, व देशाभिमानाचे आणि आत्यंतिक स्वार्थत्यागाचे खडतर व्रत स्वतः आचरून सान्या जनतेकडूनही आचरविले त्या व्रताचे उद्यापन होण्याची वेळ प्राप्त झाली असे आयलंडला वाटू लागले. शत्रूच्या अनन्वित छळाने गांजलेल्या व अवर्णनीय पराक्रम करून दमलेल्या आयर्लंड देशाचे अंतःकरण या वेळीं उत्सुकतेने बावरें झालें !