पान:डी व्हँलरा.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ डी व्हॅलेरा होईल. म्हणून पुन्हां म्हणतों, की तुमच्या १२ तारखेच्या पत्रांतील दुसरा पॅरिग्राफ तुम्ही परत घेतल्याखेरीज वाटाघाट होणे अशक्य आहे. | डी. लॉइड जॉर्ज. डी व्हॅलेराने यावर जे प्रत्युत्तर धाडलें त्यांत त्याने पुन्हा आपली बाजू स्पष्टपणे पुढे मांडून नंतर म्हटले होते, की:-- आतां हा संदेश–प्रतिसंदेशाचा क्रम असाच पुढे चालू ठेवल्यास एकमेकांच्या मनांतील गैरसमज कमी होण्याऐवजी वाढतील मात्र, आणि तहाचा जो थोडा फार संभव आहे तोही नष्ट होईल असे मला वाटते. आम्ही सर्वस्वी शरण यावें असा तुमच्या ता. ७ च्या पत्राचा अर्थ आहे, किंवा कोणतीच बाजू कोणत्याच त-हेने बांधली न जातां होणा-या सभेचे निमंत्रण देण्याचा त्या पत्राचा उद्देश आहे ? तसा उद्देश असेल तर ते निमंत्रण आम्ही स्वीकारतों, व तुम्ही ठरवाल त्या वेळी तुमच्या सरकारशी वाटाघाट करावयास आमचे प्रतिनिधि येतील. इमॉन डी व्हॅलेरा." २९ सप्टेंबर रोजी लॉइड जॉर्जकडून उत्तर आले, ते असेः-- ४६ महाराज, आपल्या दोघांमध्ये जो पत्रव्यवहार झाला त्याचे आमच्या राजेसाहेबांच्या सरकारने लक्षपूर्वक अवलोकन केले आहे. या पत्रव्यवहाराच्या पायावर सभा बोलावून तुमच्याशी वाटाघाट करणे त्यांस अशक्य वाटते. तथापि हा पहिला प्रयत्न संपला असे समजून वाटाघाटीचा दुसरा नया प्रयत्न करण्यास त्यांची तयारी आहे. म्हणून या पत्रद्वारे आम्ही तुम्हांस पुन्हां निमंत्रण देतो. वाटाघाटीची सभा ११ आक्टोबर रोजी लंडन येथे भरेल. त्या सभेत आयर्लंडचे * लोकनियुक्त पुढारी' या नात्याने तुमच्या प्रतिनिधींशी आम्ही खलबत करू, व आयर्लंडच्या आकांक्षा आणि ब्रिटिश साम्राज्याचा