पान:डी व्हँलरा.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह जवळ आला ८३

    • महाराज,

उत्तरादाखल मला इतकेच सांगावयाचे आहे, की तुम्ही तुमच्या ७ तारखेच्या पत्रांतील ज्या तत्त्वांचा उल्लेख करतां तीं समजूनच आम्ही प्रथम सभेचे आमंत्रण स्वीकारले. तुम्ही आपली तत्त्वे सोडावीं असे आम्ही कधीच म्हणणार नाही. पण आम्हांला आमची बाजू स्पष्ट करणे भाग आहे. ती स्पष्ट केल्याबद्दल सभा मोडत असेल तर त्याबद्दल आम्हांला दिलगिरी वाटते. दोन्ही देशांचे कल्याण ज्या वाटाघाटींतून निष्पन्न होईल अशी वाटाघाट व्हावी येवढा एकच उद्देश आमच्या अंतःकरणांत आहे. इमॉन डी व्हॅलेरा. | लॉइड जॉर्जकडून १८ सप्टेंबर रोजी असे उत्तर आले, कीं:-

    • महाराज,

| तुमची तार काल रात्री मिळाली. तुम्ही आपला हट्ट सोडावयास तयार नाहीं असे दिसते. तुम्ही ज्या वेळीं जुलई महिन्यांत माझ्या मुलाखतीला आलात तेव्हा ही गोष्ट तुम्ही प्रतिपादिली नाही. उलट मी तुम्हांला पहिले आमंत्रण पाठविलें त्यांत * लोकप्रिय पुढारी या नात्यानेच फक्त मी तुम्हांला बोलाविले होते, व त्या नात्यानेच तुम्ही आलांत. आपल्या मुलाखतीच्या प्रसंगीं अगदी प्रारंभालाच मी तुम्हांस बजाविले होते, की आमच्या तक्ताशी आलयँडने राजनिष्ठ राहिले पाहिजे, व ब्रिटिश राज्यसंघांत राहूनच आयलंडने आपली उन्नति करून घेतली पाहिजे. आपल्यामध्ये कांहीं तडजोड व्हावयाची असेल तर ती याच पायावर होणे शक्य आहे.

  • तुमची जुलई महिन्यांत मुलाखत घेतली तशीच लोकनियुक्त पुढारी' या नात्याने तुमच्या प्रतिनिधींची भेट घ्यावयास मी तयार आहे. स्वतंत्र व स्वयंशासित राष्ट्राने पाठविलेले वकील या नात्याने तुमच्याशी खलबत केल्यास आम्ही आमच्या तक्ताशीं द्रोह केल्यासारखे