पान:डी व्हँलरा.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० डी व्हॅलेरा म्हणूनच प्रतिनिधींची नांवे मंजूर करून घेण्यासाठी आम्ही डेल आयरिनची सभा बोलावीत आहोत. तुम्ही सुचविल्याप्रमाणे २० सप्टेंबरला इनव्हर्नेस येथे आमचे प्रतिनिधि हजर राहू शकतील असे आम्हांस वाटते. । “ या शेवटच्या पत्रांत हे नमूद करणे अवश्य आहे, की आजपर्यंतच्या पत्रव्यवहारांत आम्ही पुनः पुन्हां विशेष कटाक्षाने दर्शविली तीच आमची भूमिका अजूनही कायम आहे. ती ही कीं,- |आमच्या राष्ट्राने स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केलेले आहे, व आम्ही एक स्वयंशासित राष्ट्र आहोत असे आम्ही गृहीत धरून । |चालतो. अशा स्वयंशासित राष्ट्राने पाठविलेले प्रतिनिधि या |नात्यानेच आम्हांला तहाच्या वाटाघाटीत भाग घेता येईल. | स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाविषयीं आम्हांस इतकेच म्हणावयाचे, की आपल्या दोन देशांचा खरा सलोखा या तत्त्वाच्या पायावरच काय तो होऊ शकेल. या तत्त्वाचा अर्थ काय करावा याविषयीं वाद माजविण्यांत अर्थ नाहीं. तो उघड आहे. इमॉन डी व्हॅलेरा. | हा खलिता वाचतांना लॉइड जॉर्ज यांची तब्येत कशी फिरली तें वर सांगितलेच आहे. १४ सप्टेंबर रोजी त्यांनीं तारेनें उत्तर धाडले, की

  • मंगळवार ता. १३ रोजी तुमचा खलिता घेऊन जे इसम आले त्यांना मी कळविलें, की एका स्वतंत्र व स्वयंशासित राष्ट्राचे प्रतिनिधि या नात्याने तुम्ही आमच्या राजेसाहेबांच्या सरकारशी वाटाघाट करावयास येण्याच्या हक्काचा ज्या अर्थी तुम्ही पुनरुच्चार केलेला आहे त्या अर्थी तुमचे आमचे बोलणे होणे शक्य नाही. या हक्कासंबंधीं तुमच्या खलित्यांत जो परिग्राफ आहे त्याचे केवढे भयंकर परिणाम होतील हे मी त्यांना सांगितले, आणि त्या खलित्यांत फेरफार करावयास तुम्हांला