पान:डी व्हँलरा.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह जवळ आला ८१ संधि मिळावी म्हणून पाहिजे तर तो मुला पोंचलाच नाहीं असें समजावयास मी तयार आहे इतकेंसुद्धा त्यांस मीं अश्वासन दिले. इतकें झाल्यानंतरही तुम्ही तो खलिता प्रसिद्ध केलात. तेव्हा पुढच्या आठवड्यांत होणा-या सभेची सारी व्यवस्था मला रद्द केलीच पाहिजे व माझ्या मंत्रिमंडळाचा सल्ला घेतला पाहिजे. आमचे काय ठरेल ते मी तुम्हांस कळवीनच. पण सध्या माझी प्रकृति जरा नादुरुस्त असल्यामुळे थोडासा विलंब होणे अपरिहार्य आहे. सध्या तुम्हांस इतके कळविणे अवश्य आहे, की मीं पूर्वी स्पष्ट केली होती ती भूमिका कबूल असेल तरच सभा शक्य आहे, तुम्ही म्हणतां ती भूमिका पतकरून आम्ही तुमच्याशी वाटाघाट करणे म्हणजे आयर्लंड साम्राज्यापासून विभक्त झाले आहे. व ते एक स्वतंत्र प्रजासत्ताक राज्य आहे याविषयी आमच्या राजेसाहेबांच्या सरकारने मान्यता देण्यासारखेच होईल. आपल्या दोन्ही देशांत शांतता नांदावी म्हणून राजेसाहेबांच्या सरकारने जी उदारबुद्धि दाखविली तिचे याहून चांगलें चीज व्हावयास पाहिजे होते. पण आतांपर्यंत आम्हीच आपली जागा सोडून पुढे आलो. तुम्ही एक पाऊलदेखील सरकलां नाहींत, व आपले मूळचे पालुपद दर खलित्यांत चालू ठेवलेत. | डी. लॉइड जॉर्ज । | डी व्हॅलेराने लगेच १६ सप्टेंबरला खालील प्रत्युत्तर धाडलें.

  • महाराज,

तुमची तार काल रात्री मिळाली. तुमच्या ७ सप्टेंबरच्या पत्रांतील भूमिका मान्य करून आम्ही या सभेचे निमंत्रण स्वीकारले व आमची भूमिका कोणती याविषयीं कांहींच खुलासा केला नाहीं तर आमच्या म्हणण्याचा लोक विपर्यास करतील व आमच्या कार्याची हानि होईल हे तुम्हांस कसे समजत नाही याचे मला आश्चर्य वाटते. आतांपर्यंतच्या पत्रव्यवहारांत तुम्ही तुमच्या सरकारची वृत्ति स्पष्ट केलंत; आम्ही आमची मनोवृत्ति स्पष्ट केली. आपल्या दोघांच्या भूमिकां डी...६