पान:डी व्हँलरा.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह जवळ आला ७९ रोजी डेल आयरेनची खाजगी सभा भरली, व इंग्लंडशी वाटाघाट करण्यासाठी खालील प्रतिनिधि निवडण्यात आले. १ आर्थर ग्रिफिथः-परराष्ट्रीय मंत्री (प्रतिनिधिमंडळाचे अध्यक्ष ). २ मिशेल कॉलिन्सः-खजिनाखात्याचे मंत्री. ३ आर. सी. बार्टन. ४ ई. डगनः—मीथ व लाऊथ परगण्याचे डेप्युटी. ५ जी. जी. डफीः-रोम येथील वकील, व डब्लिनचे डेप्युटी. आमचे अमुक अमुक प्रतिनिधि वाटाघाटीसाठीं येतील असे कळविण्यासाठी मॅकग्राथ व हॅरी बोलंड यांच्या हस्ते एक खलिता पाठविण्यांत आला. लॉइड जॉर्ज यांना त्या खलित्यांतील मजकूर रुचण्यासारखा नव्हता. त्यांनी त्या दोघांची एक तासभर मुलाखत घेतल्यावर त्यांना त्या खलित्यासकट डब्लिनला परत लावून देऊन त्यांच्याबरोबर असा निरोप पाठविला, की या खलित्यांतील कांहीं विधानांत फेरफार करावयास पाहिजे आहे तो करून तो पुन्हां मजकडे पाठवा, तोपर्यंत तो खलिता मी फोडलाच नाहीं असें मी समजून चालेन. पण लॉइड जार्ज यांना पाहिजे होते ते फेरफार करण्यांत आले नाहींत इतकेच नव्हे, तर तो खलिता जसाच्या तसा प्रसिद्ध करण्यांत आला. हे पाहतांच इंग्रज मुत्सद्दी बिथरून गेले, इनव्हर्नस येथे वाटाघाट करण्यासाठीं ठरविण्यांत आलेली सभा रद्द करण्यांत आली, व या नव्या परिस्थितीत कोणत्या मार्गाने जावयाचे त्याविषयी माझ्या सहकारी मंडळींचा सल्ला मला घेतला पाहिजे असे लॉइड जॉर्ज यांनी कळविलें. ज्या खलित्याने हा सारा प्रकार झाला तो असा होताः

  • आयरिश राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षा व साम्राज्याचा संबंध या दोहोंचा कांही मेळ घालणे शक्य आहे की नाही हे ठरविण्यासाठी बोलाविण्यात येणा-या सभेत भाग घ्यावयास आमची ना नाहीं. ही आमची तयारी पूर्वी १० ऑगस्टच्या पत्रांतच आम्ही दर्शविली होती.