पान:डी व्हँलरा.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ डी व्हॅलेरा। नापास केल्या, व तो निकाल कळविण्यासाठीं लॉइड जॉर्ज यांस डी व्हॅलेराने २४ ऑगस्ट रोजीं खलिता पाठविला. त्यांत विशेष या मुद्याचर जोर दिला होता, की भूगोलदृष्ट्या आयर्लंड इंग्लंडजवळ आहे म्हणून त्याला पूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग घेता येऊ नये हे तत्त्व अत्यंत घातुक आहे. हे तत्त्व कबूल केल्यास हॉलंड व डेन्मार्क जर्मनीच्या कबड्यांत जातील, बेल्जम फ्रान्सने गिळंकृत करावे असे ठरेल, पोर्चुगालचे लोक स्पेनच्या गुलामगिरीत जातील, आणि या जगांत स्वातंत्र्य उरणारच नाहीं. खलित्याच्या शेवटीं डी व्हॅलेराने असे लिहिले होते, कीं स्वयंनिर्णयाच्या व्यापक तत्त्वाच्या पायावरच इंग्लंड आयर्लंडचा खरा सलोखा होणे शक्य आहे, व ते तत्त्व कबूल करून तहाची वाटाघाट करण्यास इंग्लंड तयार असेल तर त्या वाटाघाटीसाठी आपले सर्वसत्ताधारी प्रतिनिधि निवडून पाठविण्यास आयर्लंड तयार आहे. यानंतर उत्तरेंप्रत्युत्तरें कांहीं काळ चाललीच होतीं. लॉइड जॉर्जने प्रत्येक पत्रांत लिहावे, की जितका उदारपणा दाखविणे शक्य आहे तितका आम्ही दाखवीत आहोत, अँटन, डेव्हिस वगैरे आयरिश पुढा-यांनी नेहमी साम्राज्यांतर्गत स्वराज्याचीच मागणी केली होती व तेच आज आम्ही देत आहोंत, व उलट डी व्हॅलेराने प्रत्येक पत्रांत प्रतिपादावे, कीं आयर्लंडला पूर्ण विभक्त स्वातंत्र्याचा हक्क आहे व राजनिष्ठेची शपथ घेऊन इंग्लंडच्या राजाचे प्रभुत्व आम्ही कधीच कबूल करणार नाही, असा क्रम चालला होता. शेवटीं असे ठरले, की एकमेकाला खलिते धाडीत बसून वेळ दवडणे धोक्याचे आहे. तेव्हां कोणीच कोणावर आगाऊ कोणतीच अट न लादतां दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची सभा भरवावी व तींत कांहीं तडजोड होते की काय ते पहावे. या कराराप्रमाणे आयर्लंडचे सर्वसत्ताधारी प्रतिनिधि निवडून पाठविण्यासाठीं ता. १४ सप्टेंबर