पान:डी व्हँलरा.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह जवळ, आला ७७ आहे असे गृहीत धरले तरी शेवटी कायम होणा-या तहनाम्यांत ती भीति नाहींशी करण्यासारख्या अटी घालतां येण्यासारख्या आहेत.

  • आयलंडमधील पक्षभेदांचा प्रश्न सर्वस्वी आयरिश लोकांच्या हातीं राहिला पाहिजे. आमचे अंतर्गत प्रश्न सोडविण्याचा यत्किंचितही अधिकार इंग्लंडला असल्याचे आम्ही कधींही कबूल करणार नाहीं.
  • समंजसपणाची व न्यायाची कोणतीही गोष्ट आम्ही कधीं नाकबूल करणार नाही. आम्हांला कोणत्याही अटी पुढे करावयाच्या नाहींत किंवा कशावरही हक्क शाबित करावयाचा नाहीं. आम्हांस एकच गोष्ट पाहिजे आहे. ती म्हणजे आमचे स्वातंत्र्य. आजपर्यंत चालत आलेल्या भांडणाबद्दल तुम्ही खेद प्रदर्शित करतो. पण त्या भांडणाला आयरिश लोकांच्या स्वातंत्र्यावर इंग्रज राज्यकर्त्यांनी केलेला हल्लाच सदैव कारण झालेला आहे. तुमच्या सरकारला सुबुद्धि सुचत असेल तर हा हल्ला या क्षणाला थांबू शकेल, समंजसपणाचा व शांततेचा मार्ग कोणता ते स्पष्ट दिसतच आहे.

इमॉन डी व्हॅलेरा. | यावर ता. १३ ऑगस्ट रोजी लॉइड जॉर्ज याजकडून डी व्हॅलेरास खलिता आला त्यांत विशेषतः असे म्हटले होते, कीं इंग्लंडशीं राजनिष्ठ न राहण्याचा आयलंडला हक्क आहे हा मुद्दा इंग्लंड कधीही कबूल करणार नाहीं, व भूगोलदृष्टया आयलंड इंग्लंडच्या अतिशय जवळ असल्याकारणाने त्याचा साम्राज्यांत अंतर्भाव होणेच अवश्यक आहे. यानंतर १६ व १७ ऑगस्ट या दोन दिवशीं डेल आयरेनची साधारण सभा भरली व इंग्लंडच्या सूचनांचा त्या सभेत विचार करण्यांत आला. ही व्हॅलेराने दोन वेळां वक्तृत्वपूर्ण भाषणे करून त्या सूचनांचा फोलपणा स्पष्ट करून दाखविला. इंग्लंडसारख्या लबाड शत्रूशी आपल्याला वागावयाचे आहे हे विसरू नका असे त्याने सभासदांना पुनः पुन्हां बजाविलें. डेल आयरेनने एकमताने ब्रिटिश सूचना