पान:डी व्हँलरा.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ डी व्हॅलेरा। तर त्या गोष्टींत आयर्लंडने मदत केली पाहिजे, इंग्रजी फौजेत आयरिश लोकांची खुषीची भरती आतांप्रमाणेच चालू रहावी, इंग्लंडने व आयर्लंडने एकमेकाच्या मालावर संरक्षक जकात बसवू नये, आणि महायुद्धामुळे इंग्लंडला जे कर्ज झाले त्याचा वाजवी हिस्सा आयर्लंडने फेडावा. डेल आयरेनच्या मंत्रिमंडळातर्फे लॉइड जॉर्जच्या खलित्यास डी व्हॅलेराने ता. १० ऑगस्ट रोजी उत्तर पाठविले ते असे:- 4६ महाराज,

  • तुमच्या तारीख २० जुलईच्या खलित्यांत जी एक योजना पुढे करण्यांत आली आहे तिला डेल आयरेनची संमति मिळणे अशक्य आहे असे प्रत्यक्ष भेटींत मी तुमच्याजवळ बोलून दाखविलेंच होते. येथे आल्यावर मी आपल्या सहकारी मंडळींचा विचार घेतला आहे. माझे पूर्वीचेच मत कायम आहे असे मी या पत्रद्वारे कळवितो.
  • तुमच्या खलित्यांत आयलंडचा राष्ट्रीयत्वाचा हक्क मान्य करणारा जेवढा भाग आहे तेवढा आम्हांस पसंत आहे. पण खलित्याच्या शेवटी ज्या अटींचा उल्लेख आहे त्या राष्ट्रीयत्वाला विघातक असल्यामुळे खलित्यांत विलक्षण असंबद्धता उत्पन्न झाली आहे.
  • इंग्लंडपासून पूर्ण विभक्त होण्यांतच आपल्या सर्व ध्येयांची साध्यता होण्यासारखी आहे अशी आयरिश लोकांची खात्री आहे. साम्राज्यांत शिरल्याने आपल्या मनोवृत्तीला न पटणा-या अनेक भानगडी नाइलाजाने । करणे भाग पडेल अशी आयरिश लोकांना भीति वाटते. या व इतर अनेक कारणांसाठी साम्राज्यांतर्गत स्वराज्य घेण्याची त्यांची इच्छा नाहीं. इंग्लंडपासून आयलंडने पूर्ण विभक्त होण्यांतच दोन्ही देशांचे खरे कल्याण आहे अशी माझी व माझ्या सहकारी मित्रांची ठाम समजूत आहे. इंग्लंडचे शत्रू आयलंडचा उपयोग करून इंग्लंडवर घाला, घालतील ही इंग्लंडची भीतीच मुळीं निराधार आहे. पण ती साधार