पान:डी व्हँलरा.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह जवळ आला ७५ पाहतां या सभेतून विशेष कांहीं फलनिष्पत्ति होईल अशी फार आशः लोकांनीं न बाळगतां पुन्हां वेळच आली तर झटापट सुरू करण्याची तयारी ठेवावी अशी सूचना शेवटीं दिली होती. लंडनमधील डाउनिंग स्ट्रीट येथील कचेरीत ता. १४,१५,१८ व २१ अशा चार दिवशीं रोज तास दोन तास याप्रमाणे डी व्हॅलेरा व लॉइड जॉर्ज यांची खलबते झाली. त्यानंतर इंग्रज सरकारतर्फे जी बातमी प्रसिद्ध करण्यांत आली ती ही| आज सकाळी पुन्हां डी व्हॅलेरा व लॉइड जॉर्ज यांचे एक तासभर खलबत झाले. तहाची औपचारिक सभा कोणत्या तत्त्वावर बोलवावी याविषयी निश्चित कांहीं ठरलें नाहीं. उद्यां डी व्हॅलेरा आयलंडला परत जाईल, व आपल्या सहकारी मंडळीशी वाटाघाट करून जे काय ठरेल तें लॉइड जॉर्ज यांस कळवील. | याच्या आदल्याच दिवशी संध्याकाळीं आयर्लंडचा प्रश्न मिटविण्यासाठी लॉइड जॉर्ज यांनी आपली योजना सादर केली होती. त्या योजनेत म्हटले होते, की साम्राज्यांत राहिल्यानेच आयर्लंडच्या सर्व सामाजिक, राजकीय व धार्मिक ध्येयांची पूर्तता होईल, कानडा वगैरे वसाहतींत ज्याप्रमाणे साम्राज्यांतर्गत स्वराज्यामुळेच इंग्लंड व फ्रान्स किंवा इतर देश यांचे अनेक शतकांचे हाडवैर नाहीसे झाले त्याप्रमाणे आयर्लंडमध्येही घडून येण्यास कांहीं हरकत नाही, आणि साम्राज्यांतील सर्व राष्ट्रांशीं सहकारिता करूनच आपल्या देशाला भाग्याच्या कळसाला पोचविण्याचे कार्य आयर्लंडच्या पुढा-यांस करता येईल, असा विचार करून आयर्लंडला साम्राज्यांतर्गत स्वराज्य देण्याचे सरकारने ठरविले आहे. मात्र या स्वराज्यदानांत पुढील अटींचा अंतर्भाव होईल. त्या अटी अशा, की आयलंड व इंग्लंड या बेटांभोंवतालच्या समुद्रावर इंग्रजी आरमाराचे वर्चस्व राहिले पाहिजे, इंग्लंडचे संरक्षण करण्यासाठी आयर्लंडच्या जमिनीवर कांहीं गोष्टी करणे इंग्लंडला अवश्यक वाटले