पान:डी व्हँलरा.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ डी व्हॅलेरा यानंतर सर जेम्स क्रेग वगैरे उत्तर आयर्लंडच्या पुढान्यांशी चर्चा करण्यासाठी डी व्हॅलेराने त्यांस एका सभेला येण्याविषयी निमंत्रण पाठविले. परंतु डी व्हॅलेराशीं बोलणे करण्याचे सर जेम्स क्रेग यांनी साफ नाकारले, व लंडनच्या सभेत आपली भेट होईल तेथेच काय बोलावयाचे ते बोलतां येईल असे डी व्हॅलेरा यास त्यांनी कळविलें. त्यावर डी व्हॅलेराने जेम्स क्रेगला असे पत्र पाठविलें:- ६६ महाराज, | येथे सोमवारी होणा-या सभेसाठी मी मुद्दाम धाडलेलें आमंत्रण तुम्हांस स्वीकारता येत नाहीं याबद्दल मला अतिशय वाईट वाटते. लॉइड जॉर्ज यांच्या सूचनेत कांहीं अनिष्ट गोष्टी गर्भित असल्यामुळे त्यांची सूचना मान्य करण्यासारखी नाहीं. आयर्लंडच्या लोकांत जे कांहीं मतभेद आहेत त्यांचा निकाल आयरिश लोकांना करता येण्यासारखा आहे. इंग्लंडशीं समेटाचे बोलणे करतांना आयरिश लोकांत फाटाफूट नसावी, व आयर्लंडचे म्हणणे अगदीं एकमताने पुढे मांडले जावें ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हे कांहीं मीं सांगावयास पाहिजे असें नाहीं. इमॉन डी व्हॅलेरा. डी व्हॅलेराने बोलाविलेली पुढा-यांची सभा शुक्रवार, ता. ८ जुलई रोजी मॅन्शन हाउस येथे झाली, लॉइड जॉर्जच्या खलित्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी लढणे थांबवावे असे ठरले, हा तात्पुरता तह सोमवार, ता. ११ जुलई रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झाला, आणि लंडन येथील सभेस आपण यावयास तयार आहों असे डी व्हॅलेराने कळविले. | लंडनच्या सभेला जाण्यापूर्वी डी व्हॅलेराने एक जाहिरनामा प्रसिद्ध केला त्यांत जनतेला शांतता व शिस्त राखण्याची आग्रहाची विनंदि केली होती, आयर्लंडचे प्रतिनिधि लंडनच्या सभेत आपली शिकस्त करून पाहतील असे आश्वासन दिले होते, व पूर्वीच्या इतिहासावरून