पान:डी व्हँलरा.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह जवळ आला ७३ आपल्याबरोबर आणावे. या सभेत भाग घेण्यासाठी आयलंडतर्फे जे जे प्रतिनिधि येतील त्यांच्या सुरक्षिततेबद्दल सरकार अर्थातच हमी घेईल. “आज कित्येक वर्षे चालू असलेल्या या झगड्याने आयर्लंडमध्ये अनंत भेद उत्पन्न केले आहेत, आणि इंग्लंडच्या व आयर्लंडच्या लोकांत परस्पर वैरभाव माजविला आहे; एवढेच नव्हे तर जे दोन देश मित्रभावाने, शेजारधर्माने व सहकारितेने वागले असते तर सान्या मनुष्यजातीच्या प्रगतीला व सुधारणेला मदत झाली असती त्यांची फारकत करून, या झगड्याने एकंदर मानवजातीचेही अपरिमित नुकसान केलें आहे. हा झगडा आतां तरी थांबावा अशा अंतःकरणपूर्वक इच्छेनें आम्ही हे निमंत्रण तुम्हांस देत आहोत. राजेसाहेबांनी प्रदर्शित केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी जी जी अवश्य ती ती गोष्ट करण्यास आम्ही राजी आहोंत, व आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याशीं अत्यंत प्रेमभावाने वागण्याची इच्छा करतो त्याप्रमाणेच तुम्हीही आमच्याशी वागावे अशी आमची विनंतिं आहे. डी. लॉइड जॉर्ज. या निमंत्रणास डी व्हॅलेराकडून ताबडतोब उत्तर गेले ते असे:- ** महाराज, तुमचे पत्र पावलें. शक्य तेवढ्या सहकारी मित्रांचा सल्ला घेण्याचे काम मी करीत आहे. या दोन बेटांतील लोकांमध्ये कायमचा सलोखा घडून यावा अशी आमची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे. परंतु आयर्लंडची शकले पाडण्याचा हट्ट तुम्ही न सोडाल व स्वयंनिर्णयाचे तत्त्व तुम्ही झुगारून द्याल तर हा सलोखा घडवून आणण्याचे सर्व मार्ग खुटतील असे आम्हांस वाटते. तुमच्या पत्रास सविस्तर उत्तर देण्यापूर्वी स्वदेशांतील अल्पमताच्या पुढा-यांशी चर्चा करण्यासाठी सभा बोलावण्याच्या उद्योगांत मी आहे. इमॉन डी व्हॅलेरा.