पान:डी व्हँलरा.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ डी व्हॅलेरा नाहींत हे सर्व खरे. पण शेवटी आपलाच विजय होणार ही श्रद्धा आपण ठेवली पाहिजे. आपला निश्चय ढळू देता कामा नये, आणि आपल्या मागून येणा-या पिढीसाठीं स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्याचा उरलेला भाग पार पाडण्याकरितां धीराने कमर कसून नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे! | परिस्थिति रोजच्या रोज बदलत होती, व दिवसानुदिवस ब्रिटिश सरकार नव्या नव्या पंचांत पडत चालले होते. शेवटीं डी व्हॅलेराशी स्वतः जातीनें समेटाचे बोलणे सुरू करण्याशिवाय लॉइड जॉर्ज यांस गत्यंतर उरलें नाहीं. हे बोलणे काढण्यास कांहीं तरी प्रसंग मिळावा म्हणून २२ जून रोजी बेलफास्ट येथे राजाकडून भाषण करविण्यांत आलें, व आता यापुढे तरी आयर्लंडमध्ये शांतता नांदावी अशी इच्छा राजाच्या तोडून वदविण्यांत आली. नंतर लॉइड जॉर्ज याजकडून डी व्हॅलेरास पत्र आले ते असेः ‘महाराज, राजेसाहेबांनी शांततेविषयीं जी इच्छा परवां प्रदर्शित केली ती पुरी करण्यासाठी आपल्याकडून शक्य ती खटपट करण्याची ब्रिटिश सरकारची फार इच्छा आहे. आजची संधि वाया जाऊ देणे सरकारला उचित वाटत नाहीं, व म्हणून आयर्लंडच्या दक्षिण व उत्तर भागांच्या प्रतिनिधींबरोबर वाटाघाट व्हावी अशी ही शेवटची विनंतिं करून पाहण्याचे सरकारने ठरविले आहे. दक्षिण भागांतील बहुमताचे तुम्ही लोकनियुक्त प्रतिनिधि आहांत म्हणून तुम्हांला, व उत्तर आयलंडचे प्रतिनिधि सर जेम्स क्रेग यांना हे आमंत्रण आम्ही पाठवीत आहोत. (१) तुम्ही व जेम्स क्रेग यांनी वाटाघाटीसाठी लंडनला यावे, व समेट कसा घडवून आणतां येईल त्याविषयीं शक्य तेवढा विचार करावा. (२) यासाठी तुमच्या मनाला वाटेल त्या सहकारी मित्रांना तुम्ही