पान:डी व्हँलरा.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह जवळ आला ७१ झाले असते असा लॉइड जॉर्जला आतां पश्चात्ताप वाटावयास लागला. इंग्रज सरकारविरुद्ध चालविलेल्या युद्धांत लोकांचे सर्व प्रकारे इतकें अपरिमित नुकसान झाले होते, कीं आता हा झगडा थांबेल तर बरें अशी हळू हळू लोकांची वृत्ति व्हावयास लागली होती. अशा वेळी लॉइड जॉर्जने तहाचे बोलणे काढल्यास पदरात पडेल तेवढा स्वराज्याचा हप्ता स्वीकारावयास युद्धाला कंटाळलेले आयरिश लोक तयार होण्याचा संभव होता. या तहाच्या भुलथापांनीं आयरिश लोकांत फाटाफूट होण्याचीही भीति होती. अशा वेळीं स्वदेशी जाऊन जनतेला धीर दिला पाहिजे व आपल्या ध्येयापासून ते च्युत होत असतील तर त्यांचा तोल संभाळला पाहिजे असे वाटल्यामुळेच डी व्हॅलेरा परत आला होता. । तो अगदी वेळेवर येऊन ठेपला. त्याने थोडी दिरंगाई केली असती तर कार्यनाश खास झाला असता. सरकारच्या व जनतेच्या झटापटीला या वेळीं फारच उग्र स्वरूप प्राप्त झाले होते. फ्रान्सच्या रणांगणावरून परत आलेल्या सैनिकांची धाड सरकारने आयरिश लोकांवर सोडून दिली होती. निराशा उत्पन्न करण्यासारखा प्रसंग येऊन ठेपला होता. परंतु जनतेचा डी व्हॅलेरावर इतका निःसीम विश्वास होता, की त्याच्या तोंडचे चार धीराचे शब्द ऐकल्याबरोबर लोकांना दुप्पट आवेश चढला, आणि डोकावून पाहणारा 'पराभव पार नष्ट होऊन जयाची चाहूल साच्या लोकांना ऐकू यावयास लागली. स्वदेशांत परत आल्याबरोबर डी व्हॅलेराने आपला संदेश प्रसिद्ध केला. त्यांत त्याने असे म्हटले होते, की

    • ज्या स्वातंत्र्यासाठी आपल्यांतील शूर वीरांनी आजपर्यंत आपल्या प्राणांचा यज्ञ केला त्या स्वातंत्र्याचा विक्रय करून अर्धीमुर्धी स्वतंत्रता पदरांत घेण्याइतका नीच नराधम कोणी असेल असे मला वाटत नाहीं. वेळ कठीण आहे, चहूंकडे निराशेचा अंधार पसरला आहे, जगांतील इतर राष्ट्रे आपल्या गा-हाण्यांची दाद घ्यावयास तयार