पान:डी व्हँलरा.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें। तह जवळ आला शुक्रवार, तारीख २४ डिसेंबर १९२० रोजी डी व्हॅलेराने आयर्लंडच्या किना-यावर पुन्हा पाय ठेवला. तो पूर्वी जसा अकस्मात् अमेरिकेस गेला तसाच तो एकाएकी आयलंडमध्ये प्रगट झाला. इंग्रज सरकारने डी व्हॅलेराच्या हालचालीवर अतिशय जागता पहारा ठेवला होता. डिसेंबरच्या १३ व्या तारखेस त्याने न्यू यॉर्क येथील अॅस्टोरिआ हॉटेल सोडले त्या क्षणापासूनच त्याचा आयर्लंडमध्ये प्रवेश होऊ नये याविषयी सरकारने सर्व प्रकारची तजवीज केली. आयर्लंडच्या सर्व बंदरांवर पहा-याचा बंदोबस्त करण्यांत आला आणि अमेरिकेहून येणा-या प्रत्येक जहाजावर चढून त्याची कसून तपासणी करण्याचे अधिकांग्याना हुकूम सुटले. पण इतके करूनही शेवटी सरकारला डी व्हॅलेराने चकविले व तो २४ तारखेस अगदीं सुखरूप आयर्लंडमध्ये परत आला. या वेळीं आयर्लंडमध्ये कोणत्या प्रकारची परिस्थिति होती त्याचे दिग्दर्शन मागील प्रकरणांत केलेच आहे. डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासूनच आयर्लंडशीं समेटाचे बोलणे दुस-याकडून बोलविण्याचा उपक्रम लॉइड जार्ज यांनी सुरू केला होता. लॉइड जॉर्जच्या सांगण्यावरूनच सिन फेन पुढा-यांच्या भेटी घेण्यासाठीं आर्चबिशप क्ळून व इतर मंडळी डब्लिन शहरी आली होती. दोन्ही पक्षांनी तात्पुरता तह करून एकमेकांशी लढणे थांबवावे असा समेट बहुतेक होत आला होता. इतक्यांत बोनर लॉ यांच्या सल्ल्यावरून सरकारने अशी अट घातली कीं, आयरिश लोकांनी आपलीं हत्यारे सरकारच्या स्वाधीन करावीं. आयरिश रिपब्लिकच्या सैन्याने ही अट साफ नाकबूल केली व होत आलेल्या तहाचा मनसुबा पार फिसकटून गेला. टोरी पक्षाचा बदसल्ला ऐकण्याऐवजी आपण आपल्या मूळ बेताप्रमाणे वागलों असतो तर बर