पान:डी व्हँलरा.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमेरिका जागी केली ६९ आयर्लंडकडे ओढ घेऊ लागले. आयलंडमध्ये परत प्रवेश करणे अशक्य होते हैं तो जाणून होता. आयर्लंडभोंवतीं इंग्रजी आरमाराचा कडेकोट वेढा आहे, व लॉइड जॉर्जची परवानगी मिळविल्याखेरीज त्या वेढ्यांतून वाट मिळणे अगदीं असंभवनीय आहे हेही त्याला ठाऊक होते. पण असल्या अडचणींचा डी व्हॅलेरापुढे कधीच टिकाव लागला नाहीं. लिंकनच्या तुरुंगांतून जो निसटला, आणि ब्रिटिश आरमाराच्या हातावर तुरी देऊन जो सहा महिन्यापूर्वी आयलंडमधून अमेरिकेस आला, त्याला अमेरिकेतून आयलंडमध्ये जातांना ब्रिटिश आरमाराच्या कोंडीची काय पर्वा वाटणार ? आयरिश राष्ट्रांतील स्फूर्तीप्रमाणेच डी व्हॅलेरालाही थोपवून धरणे कठीण आहे असे डी व्हॅलेराने मागे दोन वेळां ब्रिटिश मुसत्द्यांना दाखविले होते. तीच गोष्ट त्याने आतां तिस-यांदा त्यांना पटविली. . . । . . | ' . . ਆ ਗਲ ਲਾਲ ਵਲ ਵੇਖੋਗਰਾਮ ਸਮਰ ਸੀ. .