पान:डी व्हँलरा.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ डी व्हॅलेरा . जगाचे अंतःकरण कंपित झाले. मॅकस्विनीला सरकार ज्या रीतीनें वागवीत होते तिचा निषेध करण्यासाठी डी व्हॅलेराने न्यू यॉर्कमध्ये पुष्कळ सभा भरविल्या, व मॅस्विनीच्या देशभक्तीबद्दल अत्यंत गौरवाचे व उत्तेजनाचे संदेश त्याने आयलंडमध्ये पाठविले. फादर डॉमिनिक यांच्या नांवाने पाठविलेला एक संदेश असा होताः “माझ्या तर्फे आपण लॉर्ड मेयर मॅस्विनीचे सप्रेम अभिनंदन करावे. सारे आयरिश राष्ट्र यांचे ऋणी आहे. त्यांची स्फूर्ति त्यांच्या पश्चात्ही राष्ट्रांत कायम राहील व तिच्यामुळे आत्मक्लेशाचे नवें तेज लोकांच्या अंतःकरणांत उत्पन्न होईल. मॅस्विनीच्या अतुल स्वार्थत्यागाचच पवित्र शपथ घेऊन आम्ही त्यांचे संवगडी अशी प्रतिज्ञा करतो, की त्यांनी आपले प्राण व्यर्थ खर्ची घातले असे आम्ही होऊ देणार नाहीं." या संदेशाला फादर डॉमिनिक यांजकडून डी व्हॅलेराच्या नांवाने उत्तर आलें तें असें:- | * आपल्या अभिनंदनपर संदेशाबद्दल मॅस्विनी अत्यंत आभारी आहेत. आरंभिलेल्या आत्मयज्ञांत आपल्या धीराच्या शब्दांचे त्यांना बहुमोल सहाय्य होईल. त्यांनी प्रभूवर हवाला टाकला आहे, आणि आपल्या प्राणत्यागाने आयरिश रिपब्लिकच्या कार्याची प्रगति होईल अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. तुमच्या अमेरिकेतील कार्यात प्रभू तुमचा पाठीराखा असो एवढीच त्यांची प्रार्थना आहे. . आयर्लंडमध्ये अशी निकराची परिस्थिति उत्पन्न झालेली पाहून तिकडे परत जावेसे डी व्हॅलेराला वाटू लागले. त्याची अमेरिकेची सफर पूर्णपणे यशस्वी झाली होती. खुद्द अमेरिकन सेनेटने प्रत्यक्ष ठरावाच्या रूपाने जरी अजून आयरिश प्रजासत्ताक राज्याला मान्यता दिली नव्हती, तरी सा-या अमेरिकन जनतेची मान्यता त्याने पूर्णपणे मिळविल्यामुळे तो ज्या कार्यासाठी मुख्यतः अमेरिकेस आला तेही आतां झाल्यासारखें होते. हा सर्व विचार करूनच डी व्हॅलेराचे मन