पान:डी व्हँलरा.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमेरिका जागी केली ६७ असेल किंवा नाही याविषयी शंका वाटते. टाळ्यांच्या गजराने व नाना प्रकारच्या आरोळ्यांनी सभास्थान हादरून गेले. अर्धा तासपर्यंत हा जयघोष सारखा चालू होता. डी व्हॅलेरा नुसता उभा राहिला होता. त्या घोषापुढे त्याला बोलणे शक्यच नव्हते. शेवटीं नुसत्या जयघोषाने तृप्त न होऊनच की काय, लोकांनी त्याला खांद्यावर उचलून घेतला, अमेरिकन व आयरिश निशाणे जिकडे तिकडे फडकविण्यांत आलीं, डी व्हॅलेराने चुंबन घ्यावे म्हणून तान्हीं मुले वर उचलून त्याच्या हातीं देण्यांत आली, आणि त्या अथांग जनसमूहांत टाळ्या, आणि आनंदाच्या आरोळ्या यांचा एकच हलकल्लोळ उडाला !! | डी व्हॅलेरा इकडे अमेरिकेत याप्रमाणे कार्य करीत असतांना तिकडे आयर्लंडमध्ये काय परिस्थिति होती ? तिकडे इंग्रज सरकारने जुलुमाची व अन्यायाची परमावधि करून सोडली होती. ऐन मध्यरात्री लोकांच्या घरांवर छापे घालून त्यांची धरपकड होत होती. कोणत्याही प्रकारची चळवळ केली नसतां शेंकडों लोकांना तुरुंगांत घालण्यात येत होते. तात्पुरतीं अस्तित्वात आलेलीं कोटें भराभर क्रूर, रानटीपणाच्या शिक्षा फ़र्मावीत होती. खाजगी घरांना, नगरभवनांना, गिरण्यांना, कारखान्यांना व शेतांनादेखील खुशाल आगी लावल्या जात होत्या. सभ्य लोकांना कांहीं कारण नसतां फटके बसत होते. कांहींची कत्तलही होत होती. आणि हे सर्व भयंकर अत्याचार सरकारच्या लष्करांतील शिपाईच करीत होते. या अनाचारांचा जिकडून तिकडून तीव्र निषेध होत होता. पण सरकारच्या मनांत दयेचा किंवा धर्माचा अंशही उरला नसल्यासारखे सरकारचे अमानुष धोरण अव्याहत चालूच होते. याच वेळीं कॉर्कचा मेयर टेरेन्स मॅस्विनी व इतर अनेक देशभक्त कारागृहांत अन्नत्याग करून राहिले होते, व त्यांच्या अन्नत्यागाकडे लक्ष न देतां सरकार त्यांना सोडण्याचे नाकारीत होते. या अन्नत्यागाच्या व्रतांतच शेवटी मॅस्विनीच्या प्रणांची आहुति पडली, व त्या विलक्षण बातमीनें सा-या