पान:डी व्हँलरा.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ डी व्हॅलेरा काम थंडपणाने व धिम्या अंतःकरणाने चाललेले आहे. इंग्लंडविषयीं निष्कारण द्वेषबुद्धि त्याच्या अंतःकरणांत नाहीं. मत्सर, दुष्टावा, असल्या विकारांना त्याच्या स्वभावांत जागा नाहीं. तो एक अलौकिक ध्येयपूजक आहे. त्या ध्येयाच्या तेजाने त्याच्या मुखमंडलावर प्रभा फांकल्यासारखी दिसते. आपले ध्येय शेवटी लोकांना पटणार अशा दृढ विश्वासाचे तेज त्याच्या दृष्टींत चमकते, आणि आज त्या ध्येयाचे शिक्षण देण्यासाठी लोकांची आर्जवे करावयास आपण तयार असलेच पाहिजे अशा विचाराने त्याने आपले कार्य धडाडीने चालू ठेविले आहे. । “त्याच्या अंगचा सर्वांत प्रमुख गुण म्हणजे त्याचे मार्दव. मोठे लोक नेहमीं मृदु असतात असे नाहीं. वज्राहून कठीण व लोण्याहून मृदु' ही अवस्था फक्त संतांनाच साध्य होते. इमॉन डी व्हॅलेरा हा एक संत आहे! डी व्हॅलेराच्या कित्येक भाषणांस हजर राहिल्यानंतर आर्चबिशप मॅनिक्स यांनी एकदा असे म्हटले, की “डी व्हॅलेराच्या भाषणाने जितका प्रचंड उत्साह श्रोतृसमुदायांत उत्पन्न होतो तितका दुस-या कोणाच्याच भाषणाने उत्पन्न झालेला मी आजपर्यंत पाहिला नाहीं. आयरिश प्रजासत्ताक राज्याविषयीं डी व्हॅलेरा बोलू लागला, की देशाभिमानाचे वारे त्याच्या अंगांत शिरून तो इतक्या भावनापूर्ण आवेशाने भाषण करी, की कित्येक वेळां श्रोत्यांच्या नेत्रांतून प्रेमाश्रु वाहूं लागत. एका सभेची हकीगत देतांना एका वर्तमानपत्राने असे म्हटले होते, कीं | ५६ आयरिश रिपब्लिकला मान्यता देण्याची केवढी अनावार इच्छा लोकांच्या मनांत आहे त्याचे काल शिकंग येथील सभेत पूर्ण प्रत्यंतर लें. कालच्या सभेला एक लाख लोकसमुदाय लोटला होता. सभास्थान गर्दीने कोसळावयास टेकलें होते, आणि बाहेर रस्त्यावर लोकांची अतोनात खेंच उडाली होती. आयरिश रिपब्लिकचा अध्यक्ष इमॉन डी व्हॅलेरा हा बोलावयास उठला तेव्हां लोकांनी इतक्या प्रचंड जयघोषाने त्याचे स्वागत केलें, की आजपर्यंत कोणाचे असे स्वागत झाले