पान:डी व्हँलरा.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५ अमेरिका जागी केली * स्वातंत्र्यार्थ सुरू असलेल्या या आयरिश लढाईत इमॉन डी व्हॅलेरा आपल्या अंगच्या गुणांनी उत्कृष्ट धुरंधर ठरला आहे. आयरिश लोक मूळचे भावनाप्रधान असूनही त्यांना आंवरून धरण्याचे बिकट काम त्याने केले आहे; व शत्रूने कितीही भंडावून सोडण्याचे प्रयत्न केले तरी स्वतःपुढे व देशापुढे निश्चित कार्यक्रम मांडून शांतवृत्ति न सोडतां, तो कार्यक्रम पार पाडण्यासाठी तो रात्रंदिवस झटत आहे. आज जवळ जवळ वर्षभर तो आमच्यात आहे. त्याच्या शिरावरील कार्य किती कठीण ! पण पहावें तों तें कार्य करण्याची त्याची शैली अशी अजब आहे, की ती पाहून त्याचे शत्रू रागाने वेडे होत असतील ! ‘त्याच्या कार्याचा विघात करावयास किती लोक टपलेले होते, पण त्या सर्वांच्या नाकावर टिचून त्याने आपली कामगिरी केली ! एखाद्या मुत्सद्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी डी व्हॅलेराने केली यांत. संशय नाही. त्याची बुद्धि विलक्षण आहे. त्याच्या मेंदूत गणित विषय जणू भिनला आहे. इंग्लंडशी वैर करतांना देखील त्याने त्या वैराचा गणिती हिशोब केला आहेसे वाटते. थोड्याच वर्षांपूर्वी डब्लिन शहरी देशकार्य करीत असतांना प्राण गमावण्याचा त्याच्यावर प्रसंग आला होता. त्या वेळच्या बंडांत सर्वात शेवटीं शस्त्र खाली ठेवणारा हा होता. त्याच्या जिवावर अनेक प्रसंग गुदरले आहेत, इंग्रजांच्या तुरुंगांत तो खितपत पडलेला आहे, तुरुंगांतून पळून जातांना आपले प्राण त्याने धोक्यांत घातले आहेत, आणि इंग्रजी न्यायाला धाब्यावर बसवून त्याने कित्येक दिवस अज्ञातवासांत काढले आहेत. इतकेच नव्हे, तर निजलेल्या आयर्लंडला जागे करण्यासाठी, आणि सा-या जगांत लोकसत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी रक्ताचा सडा शिंपडण्याची वेळ जर आतां यापुढे आली तर सर्वात पुढे पाऊल डी व्हॅलेराचेच पडेल. | ‘नवल हे, की इतक्या जाज्वल्य भावनांनीं डी व्हॅलेराचे अंतःकरण भरलेले असतांनाही आयरिश स्वातंत्र्यार्थ चाललेल्या झगड्यांत त्याचे डी...५