पान:डी व्हँलरा.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ डी व्हॅलेरा तुमच्या अमेरिकन राष्ट्राने असल्या तहाच्या खड्यवर सही केली तर आयर्लंडच्या पायांतील शृंखला ठोकून घट्ट बसविण्याचे घोर पातकं तुम्ही केले असेच सारे जग म्हणेल. | याचा परिणाम असा झाला, कीं तहावर सही करण्याचे अमेरिकन सेनेटने साफ नाकबूल केले. । डी व्हॅलेराने अमेरिकेत केलेल्या कार्याचे सांगोपांग वर्णन करावेयाचे म्हटले तर त्याविषयीं एक स्वतंत्रच ग्रंथ लिहावा लागेल. त्याने एकंदर ८००० मैलांचा प्रवास केला, रोज अठरा अठरा तास काम केले, आणि भाषणे किती केली त्याला तर गणतीच नाही. त्याची कीर्ति जगाच्या कानाकोपच्यापर्यंत जाऊन पोंचली. स्वतंत्र, परतंत्र सर्व देशांतील लोकांना त्याचे शब्द पटले. दूरदूरच्या देशांतून त्याला अभिनंदनपर संदेश आले. अमेरिकन रहिवाशांत हजार प्रकारच्या धर्माच्या, मनोवृत्तींच्या व मताच्या लोकांचा अंतर्भाव झालेला असल्यामुळे त्यांची अंतःकरणें काबीज करण्यास पहिल्या प्रतीच्या मुत्सद्याची व वक्त्याची जरूर होती; व ते काम डी व्हॅलेराने इतक्या यशस्वी रीतीने केले, की त्याने तोंडातून बाहेर काढलेला एकही शब्द परत घेण्याचा त्याच्यावर कधी पाळी आली नाहीं. अमेरिकेतील प्रत्येक विद्वानाने व बड्या माणसाने डी व्हॅलेराविषयीं धन्योद्गारच काढले. प्रसिद्ध रशियन मूर्तिकार ओस्कार यांपोल्स्की याने असे बोलून दाखविलें, की, 4 इमान डी व्हॅलेशने पेटविलेली ज्योत कधीच विझावयाची नाहीं ! त्या वेळी अमेरिकेत असलेले आपले देशभक्त लाला लजपतराय यांनी तर असे उद्गार काढले, कीं, ६ १९२५ सालीं आयर्लंडपेक्षां हिंदुस्थानांतच सिन फेन मताचे लोक अधिक उत्पन्न होतील ! डी व्हलेराच्या भाषणांचे अमेरिकन लोकांना विलक्षण वेड लागले होते. अमेरिका नांवाच्या पत्रांत रेव्हरंड जेम्स डेली यांनी डी व्हराविषयी फारच मार्मिक वर्णन केले होते. त्या वर्णनांतील खालील उतारा वाचण्याजोगा आहे.