पान:डी व्हँलरा.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अमेरिका जागी केली घणाचे व अर्थशून्य आहे. एखाद्या कैद्याला स्वातंत्र्य देऊन कोठडींत डांबण्यापैकीच ही गोष्ट आहे. आयर्लंडच्या प्रजासत्ताक राज्याला मान्यता दर्शविण्यास अमेरिकन सरकारला तुम्ही भाग पाडा असे डी व्हॅलेरा अमेरिकन लोकांना प्रत्येक भाषणांत सांगत होता. आपल्या भाषणांत तो कधी कधीं हिंदुस्थान, ईजिप्त व कोरिआ यांचाही उल्लेख करीत असे, व तेथेही स्वातंत्र्यासाठी झगडा कसा चालला आहे ते सांगत असे. पण डी व्हॅलेराने अमेरिकेत असतांना सर्वांत मोठी कामगिरी केली ती ही कीं, पॅरिस येथे दोस्त राष्ट्रांनीं जो राष्ट्रसंघ निर्माण केला त्याची त्याने कंबर पार मोडून टाकली. पॅरिस येथे कायम होणा-या तहाविषयीं पहिल्यापासूनच अमेरिकन लोकांना फारसा विश्वास नव्हता. अशा, स्थितींत डी व्हॅलेराच्या चळवळीची भर पडतांच लोकमताचा प्रवाह त्या तहाविरुद्ध चांगलाच जोराने वाहू लागला. त्या तहाची त्याने इतकी कांहीं सुंदर फोड करून दाखविली, की सर्वजण त्या तहाचा तिरस्कार करू लागले. तहांतील दहाव्या कलमावर डी व्हॅलेराचा सर्व कटाक्ष होता. त्या कलमाप्रमाणे असे ठरविण्यांत आले होते, का राष्ट्रसंघांत जी राष्ट्रे सामील झाली त्यांनी एकमेकांच्या राज्याचा प्रदेश जसाच्या तसा कायम ठेवण्यास एकमेकांस मदत करावी. या कलमाचा उघड उघड अर्थ असा होत होता, की ब्रिटिश साम्राज्य जसेच्या तसे कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला युद्ध करावे लागल्यास त्या युद्धांत मदत करण्याचे इतर राष्ट्रांनी इंग्लंडला वचन दिले. या कलमाला उद्देशून डी व्हॅलेरा म्हणे, • हा राष्ट्रसंघ म्हणजे आजच्या सत्ताधा-यांची सत्ता आणि आज जे गुलाम आहेत त्यांची गुलामगिरी तशीच कायम रहावी यासाठी निर्माण केलेली एक संस्था आहे. चोरांच्या कंपने परस्पर सहाय्यासाठी केलेल्या नियमांपेक्षां या राष्ट्रसंघाच्या नियमांची अधिक किंमत नाहीं.