पान:डी व्हँलरा.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ डी व्हॅलेरा शिजणे शक्य नाही असे त्यांस लवकरच वाटले, आणि रडकीं तोंडे करून ते आयर्लंडला परत गेले. ब्रिटिश लोकांनी वाटेल ते केले तरी त्यांच्या भुंकण्याकडे लक्ष न देतां गजेंद्राप्रमाणे आपली चाल चालू ठेवण्याचा डी व्हॅलेराचा निश्चय होता. त्याला पुष्कळ कामे करावी लागत खरीं. पण सगळ्या कामांत त्याचा उद्देश एकच होता. वुल्फ टोनच्या शब्दांत त्या उद्देशाचे वर्णन होण्यासारखे आहे. वुल्फ टोन एकदा म्हणाला, “या जुलमी राज्याचे उच्चाटण करणे, अनंत दुःखांची परंपरा प्रसवणारा साम्राज्यसंबंध तोडून टाकणे, आणि माझ्या प्रिय देशाचे स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हे माझे उद्देश आहेत! साम्राज्यांतर्गत स्वराज्याने, किंवा होमरूलने आयलंडचे समाधान कां होत नाहीं याविषयीं डी व्हॅलेरा प्रत्येक सभेत मोठे मार्मिक विवेचन करी. तो म्हणे, | * संपूर्ण स्वातंत्र्याचा आयरिश लोकांना जन्मसिद्ध हक्क आहे, व याखेरीज इतर कोणत्याही गोष्टीने त्यांचे समाधान होणार नाहीं. आम्हांला किती स्वातंत्र्य असावे त्याचे मोजमाप ठरविण्याचा इंग्लंडला काय अधिकार आहे ? आमच्या राष्ट्रीय मानापमानाचा सारा हिशोब चुकता झाल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही. याचाच अर्थ असा, की आमचे प्रजासत्ताक राज्य सर्वत्र मान्य झाले पाहिजे. इंग्लंडशीं संयुक्तता व विभक्तता या दोहोंच्या मधली कांहीं एखादी अवस्था आहे हे मला समजतच नाहीं. पूर्ण गुलामगिरी किंवा पूर्ण स्वातंत्र्य या दोनच अवस्था माझ्या मनाला समजतात. एक इंग्लंड आम्हांला पूर्णपणे गिळून टाकून आमचे राष्ट्रीयत्व पार नष्ट तरी करून टाकील, किंवा इंग्लंडचा संबंध सर्वस्वी तोडून टाकून आम्ही पूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग तरी घेऊ. या दोनच गेष्टी शक्य आहेत. आयलंडला हवं असेल तर ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य द्यावयास आमची तयारी आहे असे इंग्लंड नेहमी म्हणत असते. पण असे म्हणणे पोरकट