पान:डी व्हँलरा.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमेरिका जागी केली 40) असा ब्रिटिश सरकारचा डाव होता. पण डी व्हॅलेराने इतके उत्तम कार्य आधीच करून ठेविले होते, की असल्या गोष्टीने अमेरिकन लोकांची फसवणूक होणेच शक्य नव्हते. रेव्हरंड डॉक्टर अॅटन मायथन यांनी तर असे जाहीरपणे बोलून दाखविले, की १८६१ मध्ये गुलामगिरी नाहींशी करण्यासाठी झालेल्या युद्धाच्या वेळीं ज्याप्रमाणे कांहीं निर्दय, स्वार्थसाधू लोक गुलामगिरीची तरफदारी करीत होते त्याप्रमाणेच हे अल्सटरहून आलेले प्रतिनिधि स्वार्थासाठी देशाभिमान विकून काम करीत आहेत. त्याचप्रमाणे रेव्हरंड डॉक्टर अर्विन यांनी लोकांना स्पष्ट बजाविलें, की या शिष्टमंडळाला “ राजकारणातील एक लहानसा सरकारी पक्ष' यापलीकडे कांहीं किंमत नाहीं. | अल्स्टरच्या स्वराज्यविरोधासंबंधी एखाद्या सभेत बोलावयाचा प्रसंग आला म्हणजे डी व्हॅलेरा म्हणे, । • अल्स्टरचा हा प्रश्न केवळ ब्रिटिश सरकारच्या चिथावणीने उद्भूत झालेला आहे. ब्रिटिश राज्याशीं आयर्लंड संयुक्त आहे त्यांतच आमचा संतोष आहे असे अल्स्टरवाले सांगतात खरे; पण इंग्लंड व आयर्लंड यांची संयुक्तता कोणत्या प्रकारची आहे ते तुम्हांस माहीत आहे काय? मासेमा-याच्या गळाला मासा अडकला म्हणजे त्या गळाची. व माशाची जी संयुक्तता असते तीच आज इंग्लंड आयलंडची आहे. ही संयुक्तता कितीही फायद्याची असली तरी ती आम्हांस नको आहे. आयर्लंडच्या सिंहासनावरून ब्रिटिश राज्य उठल्यानंतर मग त्यांच्या भरभराटीने आम्हांस आनंद होईल. पण आज त्यांचे आमच्यावर अनन्वित जोर जुलूम चाललेले असतांना स्वतःला संयुक्त म्हणवून घेऊन त्यांच्या पराक्रमाचे, कीर्तीचे किंवा यशाचे वांटेकरी होण्याची आमची लवमात्र इच्छा नाही.' डी व्हॅलेराच्या असल्या मुद्देसूद भाषणांच्या माच्यापुढे अल्स्टरवाल्या शिष्टांच्या बायबारांचा कितीसा टिकाव लागणार ? यथे आपली डाळ