पान:डी व्हँलरा.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डी व्हॅलेरा. हे प्रयत्न पार नामशेष होऊन जात. याबद्दलचे एक उदाहरण मोठे मनोरंजक आहे. शार्लोटी येथे डी व्हॅलेराचे जाहीर व्याख्यान व्हावयाचे होते. पण ब्रिटिश एजंटांनी सर्व पत्रकारांना फितवून ठेवल्यामुळे त्या सर्वांनी व्याख्यानाच्या आगाऊ नोटिसा आपल्या पत्रांत छापण्याचे नाकारिलें. या युक्तीने डी व्हॅलेराचे व्याख्यान बंद पडेल. अशी ब्रिटिश एजंटांची अपेक्षा होती. पण प्रतिपक्षी कोणत्या मगदुराचा होता हे त्या बिचा-यांच्या ध्यानांत नव्हते. वर्तमानपत्रांचा तो संप पाहतांच डी व्हॅलेराबरोबर नेहमी फिरणारा चार्लस मॅस्विनी हा ताबडतोब शार्लोटी येथे गेला, व अवघ्या चोवीस तासांत एका चार पानी वर्तमानपत्राचा खास अंक लिहून काढून त्याने त्याच्या दहा हजार प्रति प्रतिद्ध केल्या. अमेरिकेतील आयरिश रहिवाशांनी त्या प्रति रस्तोरस्ती विकल्या, ठरल्याप्रमाणे, सभा झाली व अत्यंत यशस्वी रीतीने ती पारही पडली, आणि ब्रिटिश एजंटांच्या फजितीला पारावार उरला नाहीं. | आपल्या एजंटांची डी व्हॅलेराच्या लोकप्रियतेच्या लाटेपुढे अनुकंपनीय स्थिति होत असलेली पाहून तसले एजंट पाठविण्याचे वैग्यथ्ये ब्रिटिश सरकारला लवकरच पटले, व मग त्यांनी निराळाच कावा योजण्याचे ठरविले.स्वराज्यविरोधी म्हणून विख्यात असलेल्या अल्स्टर परगण्यांतील प्रॉटेस्टंट धर्माचे कांहीं बगलबच्चे निवडून काढून ब्रिटिश सरकारने त्यांचे एक शिष्टमंडळ बनविलें व डी व्हॅलेराचे कार्य हाणून पाडण्यासाठी त्या शिष्टमंडळाची अमेरिकेस रवानगी केली. कूट नांवाचे पालेमेंटचे एक सभासद या शिष्टमंडळाचे प्रमुख होते. एकीकडे डी व्हॅलरी आयलंडची स्वराज्याकांक्षा अमेरिकन लोकांस पटवुन देत असतां या शिष्टमंडळाने आयलंड इंग्लंडच्या सत्तेखालीं नांदावयास आनंदाने तयार आहे, असे सांगण्याचा सपाटा लावला. आयलंडमधील मूठभर चळवळे लोकच काय ते ब्रिटिश राज्याशी भांडून स्वराज्याची हाकाटी करीत आहेत असा संभ्रम अमेरिकन लोकांच्या मनांत उप्तन्न व्हावा