पान:डी व्हँलरा.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमेरिका जागी केली ५९ सरसा समाधानकारक निकाल लावून टाकू. आम्ही स्वतंत्र झालों तर त्यायोगें ब्रिटिश साम्राज्याच्या सामर्थ्यात कोणत्याही प्रकारचे न्यून न येतां आमच्या भरभराटीमुळे इंग्लंडला एक नवा आधार मिळाल्यासारखेच होईल. आमचे दोघांचेही हितसंबंध निगडित होऊन आम्ही एकीनेच वागू व एकमेकांचा एकमेकाला कल्पनातीत उपयोग होईल. अशा त-हेच्या स्पष्ट, सुसंगत आणि कोणाच्याही बुद्धीला पटेल अशा विचारसरणीने डी व्हॅलेराची भाषणे भरलेली असल्यामुळे त्यांचा अमेरिकन लोकांवर फारच परिणाम होत असे. डी व्हॅलेरा व त्याचा पक्ष आयर्लंडसाठीं भलभलत्या मागण्या करतो, असा ब्रिटिश लोकांनी केलेला ओरडा आजपर्यंत त्यांच्या कानांवर नेहमी येत असे. पण आता प्रत्यक्ष डी व्हॅलेराची भाषणे त्यांनी ऐकली तेव्हां ब्रिटिश लोकांचा तो ओरडा निरर्थक आहे व डी व्हॅलेराची मागणी सर्वथैव समर्थनीय आहे अशी त्यांची पुरती खात्री पटली. | डी व्हॅलेरा जेथे जेथे जाई, तेथे तेथे त्याचे अननुभूत स्वागत होत असे. अमेरिकन राजकरणांत इतक्या उत्साहाची खळबळ पूर्वी फारच थोड्या प्रसंगी दिसून आली असेल. संस्थानांचे गव्हर्नर, शहरांचे अध्यक्ष, हायकोटाचे न्यायाधीश, सेनेटर, धर्मगुरु, असे प्रत्येक पंथाचे, मताचे व दज्र्याचे लोक डी व्हॅलेराचा सन्मान करण्यांत अहमहमिकेने पुढे होत होते. डी व्हॅलेराचे काम निःसत्व करण्यासाठी वर्तमानपत्रांच्या व इतर मागनीं आपल्या बाजूची चळवळ अमेरिकेंत चालू ठेवण्यास इंग्लंडनें कमी केले नाही. या कामासाठी लॉर्ड नॉर्थक्लिफ यांनी कोट्यवधी रुपये बाजूला काढून ठेवले. ग्रे, ऑक्लंड गीड्स यांच्यासारखे धूर्त मुत्सद्दी अमेरिकेस मुद्दाम पाठविण्यांत आले होते. पण ड व्हॅलेरापुढे त्यांचे तेज फिके पडले. त्यांच्याकडे कोणी ढुंकून देखील पाहिलें नाहीं. डी व्हॅलेराच्या मार्गात अडचणी उपस्थित करण्यास ब्रिटिशांचे एजंट सदैव तयार असत. परंतु ही व्हॅलेराच्या लोकप्रियतेच्या लाटेपुढे त्यांचे