पान:डी व्हँलरा.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ - डी व्हॅलेरा कारणाचे यथायोग्य स्वरूप लोकांना समजावून देत असे व त्याची भाषा व विचारसरणी इतकी सरळ व स्पष्ट असे, की सभेतील प्रत्येक मनुष्य त्याच्या बाजूचा होऊन घरी परत जात असे. तो म्हणे,

    • आम्ही अमेरिकेकडून आमच्या प्रजासत्ताक राज्याला मान्यता मागतों याचा अर्थ असा मुळीच नव्हे, की इंग्लंडशीं अमेरिकेने युद्ध करावे अशी आमची इच्छा आहे. आयर्लंडचे स्वातंत्र्य कबूल करणे म्हणजे कांहीं इंग्लंडविरुद्ध हत्यार उपसणे नव्हे. आधीं अमेरिकेशी युद्ध करण्याची इंग्लंडला इच्छाच नाहीं. आणि युद्धाची इच्छा असलीच तरी आज इंग्लंड इतके दरिद्री झालेले आहे, की त्या युद्धासाठी प्रथम अमेरिकेकडूनच कर्ज काढणे त्याला भाग पडेल. तेव्हां आयर्लंडचा प्रश्न सोडविण्यास अमेरिकेने मदत केलीच पाहिजे. आज सतत ७०० वर्षे इंग्लंडशी आम्ही झगडत आहोत, आणि इंग्लंड आमच्या कारभारांतून आपला हात पुरतेपणी काढीपर्यंत आम्ही असेच झगडत राहणार ! वस्तुतः आमचे व इंग्लंडचे कांहीं वैर नाहीं. इंग्लंडने आमचे स्वातंत्र्य कबूल केले, की आज वरवर जें वैर दिसत आहे तेदेखील ताबडतोब नाहीसे होईल. आम्ही इंग्लंडशी प्रेमाने हस्तांदोलन करावयास तयार आहोंत. फक्त स्वयंनिर्णयाचे तत्त्व आमच्या बाबतींत इंग्लंडने मान्य केले पाहिजे, व आमच्यावर कोणाची व कोणत्या स्वरूपाची सत्ता असावी ते आमचे आम्हांला ठरवू दिले पाहिजे. आयर्लंडचा एक मोठा प्रश्न आहे असा इंग्रज सरकार उगीच ओरडा करीत असते. जो प्रश्न मुळीं वस्तुतः नाहींच त्याच्या बिकटपणाविषयी बाऊ. . दाखविण्यांत काय अर्थ आहे ? धर्माचा प्रश्न, बेलफास्टचा प्रश्न, वगैरे सारे प्रश्न केवळ बतावण्या आहेत. काही तरी करून मुठीतील सत्ता कायम ठेवण्यासाठी या बतावण्या इंग्लंड करीत आहे. आयलँडमधील अंतर्गत भानगडी म्हणून ज्या गोष्टींकडे बोट दाखविण्यांत येते त्या साच्या गोष्टींचा आम्हांला पूर्ण स्वातंत्र्य मिळताच आम्ही चुटकी--