पान:डी व्हँलरा.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमेरिका जागी केली ५७ डी व्हॅलेरा अमेरिकेस येण्यापूर्वी ‘डेल आयरेन'ने आयरिश प्रजासत्ताक राज्यासाठी दहा लाख पौंडांचे कर्ज उभारण्याचा ठराव पास केला होता. यांपैकी पांच लाखाचे बॉड ताबडतोब बाहेर काढावयाचे होते व ते निम्मे आयर्लंडमध्ये व अर्धे अमेरिकेमध्ये खपवावयाचे होते. अमेरिकेतील आयरिश लोकांच्या निरनिराळ्या संस्थांनी ही रक्कम गोळा करावयाचे काम जारीने सुरू केल्यामुळे डी व्हॅलेराला या कामांत फारसे लक्ष घालावे लागलें नाहीं. इतकेच नव्हे, तर अमेरिकेत हे काम इतकें झपाट्याने व्हावयास लागले, की २५ लाखांची रक्कम । केव्हांच जमून तयार झाली व पूर्वी इच्छांकी ठेवलेला आंकड़ा मुद्दाम वाढवावा लागला. पण फंड जमविणें हें डी व्हॅलेराचे मुख्य कार्य नव्हते. सॅन फ्रान्सिस्को येथील ५०००० श्रोतृसमुदायाच्या सभेमधील अत्यंत वक्तृत्वपूर्ण भाषणांत त्याने आपल्या कार्याचा उल्लेख करतांना असे म्हटले, की, म अमेरिकन लोकांकडे मुद्दाम आलो आहे, व अमेरिकन लोकांनी मला जे सहाय्य केले आहे त्यामुळे माझे केव्हांच समाधान झाले आहे. तुमच्याकडून आयलंडला द्रव्याची मदत मिळवावी हा माझा इकडे येण्यांत एक उद्देश होता हे खरे; पण या देशांत येऊन मला जे कार्य प्रामुख्याने करावयाचें तें हैं, की आयरिश प्रजासत्ताक राज्याला तुमची मान्यता मिळवावयाची. द्रव्याचे विशेष महत्त्व नाही, आमचा देश मोठा आहे, समृद्धही आहे. द्रव्यबळाची आम्हांला ‘फारशी ददात नाहीं. आमचे प्रजासत्ताक राज्य तुम्ही मान्य केले नाहींत व मला ढीगभर द्रव्य दिलेत तर त्यांत मला काडीइतकेही समाधान होणार नाही. उलट मला एक पै देखील न देतां आमच्या राज्याला तुम्ही आपली मान्यता दर्शविलीत तर त्यांत मला शतपट अधिक समाधान होऊन मी मोठ्या आनंदाने स्वदेशी परत जाईन. ठिकठिकाणच्या सभांमधून बोलतांना डी व्हॅलेरा आयरिश राज