पान:डी व्हँलरा.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६. डी व्हॅलेरा आणि त्याच्याकडे पाहिल्याबरोबर हा अगदी सणसणीत प्रकृतीचा मनुष्य असला पाहिजे अशी खात्री पटते. त्याचे केस जरा पिंगटसर आहेत. एकही केस पांढरा झालेला नाही. आणि त्याचे ते पाणीदार पिंगे डोळे इतके अवर्णनीय आहेत, की असले डोळे मी कधी पूर्वी पाहिल्याचे मला आठवत नाहीं. गर्विष्ठपणाची किंवा अहंमन्यतेची अंधुक देखील छटा त्याच्या वागण्यांत दिसून येत नाही. खरोखरीचे मोठे लोक असतात तसा डी व्हॅलेरा आहे. साधेपणा, प्रेमळपणा आणि अंत:करणाचा मोकळेपणा यांचा तो मूर्तिमंत पुतळा आहे. किंग आल्बर्ट किंवा प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेटण्यापेक्षां तुम्हांला भटण्याची मला शतपट अधिक उत्कंठा होती' असे मी त्याला म्हटले तेव्हां त्याने हास्य केले. आयरिश स्वातंत्र्याचा मी पुरस्कर्ता नसतों तरी डी व्हॅलेराचा मी पुरस्कर्ता झालो असतो. त्याच्या उमदेपणाला सीमा नाहीं ! | या वर्णनाप्रमाणे सर्वच अमेरिकन लोकांची डी व्हॅलेराविषयींची वृत्ति होती. त्याचे व्यक्तिवैशिष्ट्य आणि तो ज्या कार्यासाठी झटत होता त्या कार्याचे पावित्र्य या दोहोंमुळे अमेरिकन लोकांच्या उत्साहाला भरते आले, व त्यांचे आयर्लंडविषयींचे प्रेम कळसाला पोंचले. त्याचा जिकडे तिकडे सन्मान होत होता खरा, पण आपला स्वतःचा बडेजाव वाढवून घेण्याची त्याला यत्किंचितही इच्छा नव्हती. उलट निरनिराळ्या संस्थानांतून त्याची जाहीर मिरवणूक काढुन लोकांनी आनंदाने जयघोप केला तेव्हां या जयघोषांतील प्रत्येक आरोळी आयलंडच्या स्वातंत्र्यासाठीच असली तर मला अधिक आनंद होईल?' असे त्याने प्रत्येक वेळी बोलून दाखविले. त्याच्या असाधारण बुद्धिमत्तेविषयी आदर प्रगट करण्याकरितां निरनिराळ्या युनिव्हर्सिट्यांनीं व कॉलेजांनी त्याला सन्मानाच्या पदव्या अर्पण केल्या त्या वेळीं देखील * हा सर्व सन्मान माझा नसून माझ्या स्वदेशाचा आहे असे मी समजतों असेच उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडले.