पान:डी व्हँलरा.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमेरिका जागी केली ५५ भोंवतीं सारखी गर्दी होऊन राहिली, प्रमुख वर्तमानपत्रकारांनी आपले बातमीदार त्याच्या मुलाखतीसाठी पाठविण्याचा धडाका लावला, आणि आयरिश राजकारणाविषयींच्या त्याच्या विचारांनी दैनिक पत्रांचे कॉलमच्या कॉलम भरून निघू लागले. त्याच्या भोवतालची ती गर्दी, त्याचा तो तेज:पुंज चेहरा, आणि त्याच्या सामथ्र्याविषयी इंग्लंडला वाटणारा दरारा पाहून आपण आयलंडच्या अनभिषिक्त राजाचेच दर्शन घेत आहोत असे कोणालाही वाटले असते. तारुण्यांत डी व्हॅलेरा फारच सुंदर होता. तुरुंगांतील हाल अपेष्टांमुळे व राजकारणाच्या चिंतेमुळे त्याचे ते मूळचे सौंदर्य आता कायम राहिले नव्हते, तरी त्याच्या भव्य मूर्तीचा व रुबाबदार चेह-याचा परिणाम प्रत्येकाच्या मनावर ताबडतोब होत असे डी व्हॅलेराला एकदां प्रत्यक्ष भेटून त्याच्याशी हस्तांदोलन करण्याची उत्कंठा प्रत्येकाला लागलेली होती. या बाबतीत ‘पिट्सबर्ग डिस्पॅच'च्या एका लेखकाने मोठे सुंदर वर्णन केले होते. तो लिहितो, “ मला डी व्हॅलेरा आवडेल हे मला पहिल्यापासूनच माहीत होते. पण तो मला इतका आवडेल अशी मला कल्पना नव्हती. त्याचे फोटो आपण पाहतों यांसारखा तो मुळीच दिसत नाहीं. मी बसलो होतो त्या दिवाणखान्यांत येऊन त्याने माझे स्वागत केले तेव्हां हाच डी व्हॅलरा की काय अशी मला क्षणभर शंका वाटली. तो जरा कृश असेल व त्याच्या हालचाली अगदीं सावकाशीच्या असतील अशी माझी कल्पना होती. पण ती अगदीं चुकीची ठरली. एक तर इतर मोठ्या लोकांप्रमाणे त्याने मला दिवाणखान्यांत मुळीच तिष्ठत ठेविलें नाहीं. माझ्या नांवाची चिठी आंत त्याच्याकडे जातांच तो ताबडतोब बाहेर आला, व मला भेटण्यांत त्याला खरोखर अत्यंत आनंद झाल्याप्रमाणे त्याने माझ्याशी हस्तांदोलन केले. तो अगदीं पुरा सहा फूट उच आहे, कदाचित् थोडा जास्तच असेल. तो अगदीं सरळ ताठ उभा राहतो, त्याच्या हालचालींत तडफ भरलेली आहे,