पान:डी व्हँलरा.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें । अमेरिका जागी केली सन १९१० च्या जून महिन्याच्या प्रारंभीं डी व्हॅलेरा अकस्मात् आयर्लंडमधून नाहीसा झाला ! लिंकनच्या तुरुंगांतील सुटकेप्रमाणेच हे त्याचे नाहीसे होणे अद्भुत होते. कारण डी व्हॅलेराला आयलर्डमध्येच डांबून ठेवण्याच्या हेतूने सरकारने आयलंडच्या बेटाभोंवतीं आपल्या आरमाराचा असा कांहीं पोलादी वेढा दिला होता, की परराष्ट्रीय सेक्रेटरीचा लेखी परवाना जवळ असल्याखेरीज आयर्लंडबाहेर पडणे कोणालाही शक्य नव्हते. आणि असला परवाना तर डी व्हॅलेराने. कधीं मागितलाही नव्हता! मग तो आयर्लंडमधून गेला तरी कसा ? प्रत्येकाला याबद्दल मोठे गूढ पडले. तो समुद्रांतून गेला, की विमानांतून निसटला याचा कोणालाच उलगडा पडेना. तो कसा गेला हे त्याचे त्यालाच माहीत. तो गेला एवढे खरें ! | इंग्लंडमधील लोकांना वाटले, कीं डी व्हॅलेरा तहपरिषदेपुढे आपले म्हणणे मांडण्यासाठी पॅरिसला गेला असावा. पण असा तर्क करणान्यांना हे माहीत नव्हते, की आतां डी व्हॅलेराच्या मनांत तहपरिषदेविषयी काडीइतकासुद्धां विश्वास उरलेला नव्हता. पॅरिस शहरीं जाऊन तेथे जमलेल्या धुंडांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे हेलपाटे घालीत आपला वेळ दवडण्याइतका तो दुधखुळा नव्हता. पण तो कोठे गेला असावा याविषयी लोक आपापली मति चालवून तर्क लढवीत होते इतके खरे. अखेर २१ जून रोजी हॅरी बोलंड याने जाहीर केले, कीं डी व्हॅलेरा न्यू यॉर्क शहरी येऊन उतरला आहे. अॅस्टोरिआ हॉटेलमध्ये डी व्हॅलेरा उतरला, व तेथेच त्याने आपली कचेरी थाटली. अमेरिकेतील निरनिराळ्या संस्थानांकडून संदेशांचा ब. निमंत्रणांचा त्याच्यावर सारखा वर्षाव होऊ लागला. त्याच्या खोली