पान:डी व्हँलरा.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मस्तवाल मुत्सद्यांना शह ५३ डन यांची भेट घेतली. परंतु त्या भेटींत कांहीं एक निष्पन्न झाले नाहीं. “मी चवदा तत्त्वांचे प्रतिपादन केले खरे, परंतु माझ्या तत्त्वांना धाब्यावर बसवून बाकीचीं राष्ट्रे तहाचा खडा तयार करीत आहेत, व त्या धटिंगणांच्यापुढे माझे कांहीं चालत नाही' असली रडवी कबुली बोलून दाखवून प्रेसिडेंट वुइल्सन यांनी वॉल्श व डन यांची बोळवण केली. तहपरिषदेत असे होणार व आयर्लंडच्या कार्याला त्या परिषदेच्या कडून विशेष पाठिंबा मिळणार नाही, असा डी व्हॅलेराने पूर्वीपासूनच थोडा फार तर्क बांधून ठेवला होता. इंग्लंड, फ्रान्स वगैरे सर्वच ‘दोस्तांना आपआपले स्वार्थ थोड्या फार अंशाने साधावयाचे असल्यामुळे एकमेकांच्या चो-यांकडे दुर्लक्ष करणा-या सहकारी दरोडेखोरांप्रमाणे ते वागतील, हे भाकीत व्हॅलेराने आपल्या मनाशीं आधीं'पासूनच करून ठेविले होते. तेच भाकीत खरे होण्याची चिन्हे दिसू लागतांच डी व्हॅलेराने निराळाच उपाय अंमलात आणण्याचे ठरविले. स्वार्थाचे आसन न सोडतां गुर्मची भाषा बोलणान्या इंग्लंडच्या मस्तवाल मुत्सद्यांना असा कांहीं रामबाण शह देण्याचे डी व्हॅलेराने योजून ठेवले होते, की तो शह बसतांच तहपरिषदेत झालेल्या तहाचा खड कुचकासाचा कागदाचा चिटोरा ठरण्याची इंग्लंडला भीति वाटू लागली, व डी व्हॅलेराची गांठ घेण्याचे साफ नाकारणारे लॉइड जॉर्ज आपण होऊन समेटाचे बोलणे बोलू लागले. डी व्हॅलेराच्या या अलौकिक मुत्सद्दीपणाच्या शहाचे विवेचन पुढील प्रकरणांत करूं. | . . ..