पान:डी व्हँलरा.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ डी व्हॅलेरा पुढे आलेसे वाटले, की त्याची गुरगुर सुरू होई. * तहपरिषदेस जम-- लेले प्रतिनिधि खाजगी स्वरूपाची मुलाखत द्यावयास तयार असत. परंतु, परिषदेचे अधिकारी या नात्याने भेटावयास जाऊन कोणी त्यांच्या दारावर थाप मारली, कीं ते भराभर खिडकीबाहेर उड्या टाकीत असे वॉल्श यांनी एके प्रसंगी विनोदपूर्ण वर्णन केले ते अगदीं यथार्थ होतें.. आयलंडचे कोणतेही म्हणणे ऐकण्यास आपण तयार नाही अशी बेमुर्वतीची वृत्ती लॉइड जॉर्ज यानीं प्रथम स्वीकारली होती. पण नंतर मागे लिहिल्याप्रमाणे अमेरिकेतील लोकमताचाही आयर्लंडच्या कार्याला जोराचा पाठिंबा मिळाला तेव्हां लॉइड जॉर्ज जरा नरम आले, व त्यांनीं मग निराळ्याच युक्त्या लढविण्यास प्रारंभ केला. अमेरिकेहून येणा-या वॉल्श-- प्रभृति प्रतिनिधींची स्वतः भेट घेण्याचे त्यांनी कबूल केले, पण या भेटीची वेळ मात्र दिवसेंदिवस लांबणीवर टाकण्याचा डाव त्यांनी सुरू केला. वाटल्यास वॉल्श वगैरे मंडळींनीं आयर्लंडमध्ये जावे व तेथील परिस्थिति प्रत्यक्ष पाहून डी व्हॅलेराशीही चर्चा करावी अशीही आपली कबूली लॉइड जॉर्ज यांनी बोलून दाखविली. त्याप्रमाणे वॉल्शप्रभृति मंडळी आयर्लंडला गेली. त्यांच्या या सफरीमुळे तहपरिषदेची कोंडी त्यांस फोडता आली नाहीं तरी दुसरा एक फार महत्त्वाचा फायदा झाला. सफर पुरी केल्यानंतर त्यांनी जो रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्टात इंग्रजांच्या पदरीं अन्यायाचे व जुलुमाचे पुरते माप घातले गेले. हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून अमेरिकन लोकांना आयर्लंडच्या चळवळीविषयी फार सहानुभूति वाटू लागली. हा रिपोर्ट पाहतांच आपण करावयास गेलों एक आणि झालें। भलतेच असे लॉइड जॉर्ज यांना होऊन गेले. त्यांना मनस्वी संताप आला, व वॉश आयर्लंडहून परत आल्यावर मुलाखतीसाठी आपल्याकडे येऊ नये म्हणून मी मुलाखत घ्यावयास तयार नाही' असे त्यांनी त्यास संतापाच्या भरांत कळविलें. प्रेसिडेंट वुइल्सन यांनी वॉल्श वः