पान:डी व्हँलरा.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मस्तवाल मुत्सद्यांना शह ५१ सह्या करण्यास आयरिश राष्ट्राने आम्हांला प्रतिनिधि म्हणून नेमले आहे असे आम्ही आपणांस कळवितों, महाराज, आमच्या सादर प्रणिपातांचा स्वीकार व्हावा. इमॉन डी व्हॅलेरा. आर्थर ग्रिफिथ. जॉर्ज नोबल काउंट प्लंकेट. पुन्हां २६ मे रोजी या तिघांच्या सह्यानिशीच आणखी एक खलिता पाठविण्यात आला. त्यांत आयर्लंडमध्ये ब्रिटिश अधिका-यांनी किती दडपशाही माजविली होती त्याचे दिग्दर्शन करून पुढे असे म्हटले होते, की आयर्लंड ताब्यांत ठेवण्याचा इंग्लंडला कोणताही हक्क नाहीं, व हा हक्क तहपरिषदेपुढे नाशाबीत करण्याची आयर्लंडच्या | प्रतिनिधींना संधि देण्यात यावी. . अशा प्रकारें तहपरिषदेच्या सभासदांपुढे आपले म्हणणे मांडण्याची संधि मिळावी म्हणून डी व्हॅलेराने शक्य तितकी खटपट केली. पण तहपरिषदेत इंग्लंडच्या मुत्सद्यांचाच प्रभाव प्रबळ होता. ईजिप्तच्या शिष्टमंडळाचा मुख्य झगळूल पाशा याला ज्याप्रमाणे तहपरिषदेपुढे बोलण्याची परवानगी मिळाली नाही, त्याचप्रमाणे डी व्हॅलेरालाही ती परवानगी नाकारण्यांत आली. तहपरिषदेत आयर्लंडचे कांहीं देखील काम झाले नाहीं. टी ओकेली व डफी यांनीं डी व्हॅलेराची व तहपरिपदेच्या सद्गृहस्थांची एकदां मुलाखत तरी व्हावी म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. पण परिषदेस जमलेल्या राष्ट्रांनी डी व्हॅलेरास मुलाखत देण्याचे साफ नाकारले. ज्या उदात्त तत्त्वांसाठी महायुद्ध झालें तीं तत्वे डोळ्यांपुढे ठेवून दोस्त राष्ट्रे थोडींच परिषद चालवीत होतीं ? परिषदेस जमलेल्या साच्या राष्ट्रांची स्थिति हाडकावर नजर ठेवून बसलेल्या श्वानांप्रमाणे होती. प्रत्येकाची नजर कोणत्या ना कोणत्या तरी हाडकावर होती, व हे हाडूक आपल्यापासून हिरावून घेण्यासाठी कोणी