पान:डी व्हँलरा.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

fu ५० डी व्हॅलेरा आर्थर ग्रिफिथ, आणि काउंट प्लंकेट यांना तहपरिषदेपुढे आयर्लंडची कैफियत मांडण्यास परवानगी मिळावी व प्रेसिडेंट वुइल्सन यांचे स्वयंनिर्णयाचे तत्त्व आयर्लंडला लागू करण्यात यावे. या परिषदेतच एक कमिटी नेमण्यांत येऊन तिच्यातर्फे पॅरिस शहरी आयर्लंडसाठीं खटपट करण्याकरितां, वॉल्श, डन आणि रिअॅन यांस पाठविण्यांत आले. | अमेरिकेतील आयरिश लोक याप्रमाणे आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी खटपट करीत असतांना इकडे खुद्द आयर्लंडमध्ये डी व्हलेराचे काम अव्याहत चालूच होते. १७ मे रोजी तहपरिषदेचे अध्यक्ष एम् . क्लेमेको यांजकडे आयरिश प्रजासत्ताक राज्याकडून खालील खलिता पाठविण्यांत आलाः

    • महाराज,

“सध्या चालू असलेल्या तहपरिषदेंत जो तहाचा खड निश्चित होईल त्यावर ब्रिटिश राज्याच्या प्रतिनिधींच्याही सह्या होतील, व आयर्लंडचीही संमति त्या सह्यांतच अंतर्भूत झाली असे समजण्यात येईल अशी आमची कल्पना आहे. “म्हणून आयलंडच्या वतीने कोणत्याही प्रकारे बोलण्याचा किंवा करार करण्याचा ब्रिटिश प्रतिनिधींना हक्क नाही ही आयरिश प्रजासत्ताक राज्याने पूर्वी अनेक वेळां जाहीर केलेली गोष्ट आज आम्ही त्या राज्याच्या वतीने पुन्हां जाहीर करीत आहोत. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावे, व तहपरिषदेचेही लक्ष वेधावे अशी आपणांस विनंति आहे. ब्रिटिश मुत्सद्यांच्या सह्यांनी पुरा झालेला कोणताही तहनामा आयरिश लोक बंधनकारक समजणार नाहीत. कायदेशीरपणे ज्या तहाला आयरिश प्रतिनिधींची संमत मिळेल तो तह आयरिश लोक मोठ्या आनंदाने व तत्परतेने पाळतील. परंतु आयर्लंडच्या वतीने संमति देण्याचा अधिकार ब्रिटिश प्रतिनिधींना मुळीच असू शकत नाही. तहपरिषदेमध्ये आयलंडतर्फ बोलण्यास व जे तहनामे होतील त्यांवर आयरिश राष्ट्रातर्फे