पान:डी व्हँलरा.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ मस्तवाल मुत्सद्यांना शह रील व काय करील याविषयी काडीचीही पर्वा करावयाची नाहीं,असे त्यांनी ठरविले होते. आयरिश प्रजासत्ताक राज्याने स्पष्टपणे आंखलेला कार्यक्रम त्यांच्यापुढे होता. त्या कार्यक्रमाला साच्या जनतेने आपलें पूर्ण पाठबळ दिले होते, आणि हा कार्यक्रम तडीस नेण्याचा त्यांचा कृतनिश्चय होता. प्रेसिडेंट वुइल्सनची चवदा तत्त्वे त्यांनी आपल्या डोळ्यांपुढे ठेवली होती, आणि लहान राष्ट्रांविषयी दोस्त राष्ट्रांनी वेळोवेळी जे सहानुभूतीचे जाहिरनामे काढले होते त्यांचाच त्यांनी आपल्या चळवळीला आधार घेतला होता. इंग्रज राज्यकर्त्यांना जर कांहीं अनिष्ट असेल तर ते हेच होते. जुगोस्लाव्ह, युक्रेनियन वगैरे लोकांच्या बाबतींत बोलतांना स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला डोक्यावर घेऊन नाचावयास त्यांची तयारी होती, पण तेच तत्त्व कोणी आयलंडला लागू करूं लागले, की त्यांच्या कपाळाला आंठ्या चढत. आयलंडची वाचाच बंद करून टाकण्याची त्यांची खटपट होती. सभाबंदी व भाषणबंदी हा तर रोजचा क्रम होऊन बसला होता. लष्करी कोर्टापुढे रोज खटले चालू होते. लोकांना शिक्षा सुनावण्यांत येत होत्या. लोकही बिनदिक्कत तुरुंगांत जात होते. आणि या सा-या दडपशाहीने आयलंडच्या कार्याची पीछेहाट होण्याऐवजी प्रगतीच होत होती. इंग्रजी न्यायको आम्ही ओळखीत नाहीं असे सिन फेन पक्षाचे लोक म्हणू लागले होते, व त्यांच्यावरखटले भरले तर खटल्याचा सारा प्रकार ते हास्यास्पद करून टाकीत. | याच सुमारास, म्हणजे डी व्हॅलेराच्या मुक्ततेनंतर एका पंधरवड्याने अमेरिकेतील अखिल आयरिश रहिवाशांची फिलाडेल्फिया येथे एक प्रचंड परिषद भरली. आयर्लंडच्या कार्यासाठी इतकी जंगी परिषद अमेरिकेत आजपर्यंत भरली नव्हती. या ‘आयरिश रेस कन्व्हेन्शन'ला एकशे तीस प्रतिनिधि आले होते. हे सर्व प्रतिनिधि बडे मानमरातबाचे लोक असल्यामुळे त्यांच्या म्हणण्याला फार महत्त्व होते. या कन्व्हेन्शनने केलेल्या ठरावांपैकी मुख्य ठराव असे होते, की इमॉन डी व्हेरा, डी...४