पान:डी व्हँलरा.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ डी व्हॅलेरा स्पष्टपणे प्रगट केली आहे, त्या अर्थी आज या राष्ट्रीय पार्लमेंटमध्ये जमलेले आम्ही प्रतिनिधि पूर्वी स्थापन झालेल्या आयरिश रिपब्लिकला पुन्हां जाहीर मान्यता दर्शवितों, आणि या रिपब्लिकला पूर्ण मूत स्वरूप यावे यासाठीं हरएक प्रयत्न करण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो. आम्ही असेही जाहीर करतो, की आयर्लंडच्या लोकांविषयी कायदे करण्याचा अधिकार आयरिश लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींनाच फक्त आहे, त्यांनी केलेले कायदेच तेवढे आयरिश लोकांना बंधनकारक आहेत, आणि आयरिश पार्लमेंटखेरीज दुस-या कोणत्याही पार्लमेंटविषयी निष्ठा बाळगण्याचे आयरिश लोकांवर बंधन नाहीं. त्याचप्रमाणे आम्ही असे जाहीर करतो, कीं आयर्लंडमध्ये परकीयांनी सत्ता चालविणे म्हणजे आमच्या जन्मसिद्ध हक्कांवर स्वारी करण्यासारखे आम्हीं समजतों, व ही सत्ता आम्ही केव्हाही सहन करणार नाहीं. इंग्रजी लष्कराने आमचा देश ताबडतोब सोडून जावे असे आम्ही बजावतों. | “आमच्या स्वातंत्र्याला जगांतील सर्व स्वतंत्र राष्ट्रे संमति देतील व आम्हांला ती मदतही करतील अशी आमची दृढ आशा आहे. आम्हांला स्वातंत्र्याचा पूर्णपणे उपभोग घ्यावयास मिळेपर्यंत अंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित होणार नाही असे आम्ही जाहीर करतो. । | * ज्या सर्वसाक्षी व सर्वशक्तिमान प्रभूने आमच्या पूर्वजांना स्वातंत्र्यासाठीं घोर युद्ध करण्यास सामर्थ्य दिले त्याच्या न्यायीपणावर अढळ निष्ठा ठेवून आम्ही त्यास सर्वस्वी शरण जातं आहोत. आमच्या स्वातंत्र्य युद्धाचा शेवट लवकरच होणार असे आज दिसत आहे. अशा वेळी त्या प्रभची कपादृष्टि आमच्यावर असो अशी आमची प्रार्थना आहे. एकीकडे पॅरिस शहरी दोस्त राष्ट्रे तहपरिषदेचा खल करीत होलीं, तर दुसरीकडे सर्व जगापुढे आपली कैफियत मांडण्याच्या कामांत डी व्हॅलेरा व त्याचे मदतगार गुंतले होते. इंग्लंड कोणते धोरण स्वीका