पान:डी व्हँलरा.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मस्तवाल मुत्सद्यांना शह ४७ की पूर्वी त्यांचे ६८ सभासद होते ते आतां अवघे ६ च निवडून आले. ‘राष्ट्रीय पक्षाचे ६ सभासद, युनिअनिस्ट पक्षाचे २६ सभासद, व बाकीचे ७३ सिन फेन सभासद अशी ती निवडणूक झाल्यामुळे सिन फेन पक्ष किती प्रबळ होता व देशांत त्याला केवढे प्रचंड पाठबळ होते हे अगदी स्पष्ट झाले. हे पाहतांच डी व्हॅलेराने एक महत्त्वाचे काम केले. २१ जानेवारी १९१९ रोजी त्याने • डेल आयरेन'ची व्या वर्षाची पहिली सभा बोलाविली व त्या सभेत ‘आयरिश स्वातंत्र्याचा जाहिरनामा' प्रसिद्ध केला. ही जाहिरनाम्याची गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. कारण आतां यापुढे आयर्लंडमध्ये ब्रिटिश सत्ता चालू नसून आयरिश रिपब्लिकची सत्ता सुरू आहे असेच सारे आयरिश लोक समजणार असा त्या जाहिरनाम्याचा अर्थ होता. या जाहिरनाम्याच्या जोरावरच परराष्ट्रांपुढे, विशेषतः अमेरिकेपुढे, डी व्हॅलेराला आयर्लंडची कैफियत मांडतां आली. आणि शेवटी या जाहिरनाम्यामुळेच लॉइड जॉर्ज वठणीवर येऊन आयलंडच्या पुढा-यांशी समेट करण्यास त्यांनी आपण होऊन आपली तयारी दर्शविली. तो जाहिरनामा असा होता:- 4 ज्या अर्थी आयर्लंडच्या लोकांना स्वातंत्र्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, ज्या अर्थी परकी अंमलाविरुद्ध आज सतत ७०० वर्षे आयरिश लोकांनी सशस्त्र झगडा चालविलेला आहे, ज्या अर्थी या देशांतील इंग्रजी सत्तेला लोकांची काडीमात्रही संमति नाही व ती सत्ता शस्त्रास्त्रांच्या जोरावर आणि अनीतीवरच आजपर्यंत उभी राहिलेली आहे, ज्या अर्थी १९१६ सालीं ईस्टरच्या सोमवारी डब्लिन येथे आयरिश लोकांच्या तर्फे आयरिश रिपब्लिकन सैन्याने आयरिश प्रजासत्ताक राज्य स्थापन झाले असल्याचे जाहीर केलें, व ज्या अर्थी डिसेंबर १९१८ च्या निवडणुकीत प्रजासत्तावादी लोकांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन आयरिश रिपब्लिकविषयींची आपली निष्ठा लेकांनी